Janhvi Kapoor आणि शिखर पहाडियाच्या नात्यावर बोनी कपूरचा मोठा खुलासा

Janhvi Kapoor Shikhar Pahariya : जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या नात्याबद्दल काहिच सांगत नसली तरी, बोनी कपूर सोबतचा शिखरचा फोटो आणि याआधी दोघांचे व्हेकेशनचे फोटो खुप काही सांगून जात आहे.

Updated: Dec 27, 2022, 09:17 PM IST
 Janhvi Kapoor आणि शिखर पहाडियाच्या नात्यावर बोनी कपूरचा मोठा खुलासा title=

Janhvi Kapoor Shikhar Pahariya : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. जान्हवीचे नाव शिखर पहाडियासोबत (Shikhar Pahariya) नेहमीच जोडले गेले आहे. त्यामुळे तो जान्हवीचा बॉयफ्रेंड असल्याची नेहमीच चर्चा असायची. आता जान्हवीचे वडिल बोनी कपूर (Boney Kapoor) यांचा शिखर पहाडियासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरून पुन्हा एकदा त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. 

जान्हवी कपूरचे (Janhvi Kapoor) नाव अनेकदा शिखर पहाडियासोबत (Shikhar Pahariya) जोडले गेले होते. अनेकदा ते दोघे एकत्र स्पॉट देखील झाले आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये त्यांच्या नात्याची नेहमीच चर्चा असायची. मात्र आता एका व्हायरल फोटोने हे नाते खुपच घट्ट असल्याचे संकेत दिले आहेत. नेमकं या फोटोत काय? व या फोटोतून काय संदेश जातोय, हे जाणून घेऊयात.  

फोटोत काय?

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) याचा नुकताच वाढदिवस पार पडला. या वाढदिवसानिमित्त त्याने बर्थडे पार्टी ठेवली होती. या बर्थडे पार्टीला अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया (Shikhar Pahariya) देखील स्पॉट झाला होता. या पार्टीत शिखरने जान्हवीचे वडील बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्यासोबत एक फोटो काढला होता. या फोटोमध्ये बोनीने शिखरच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि दोघांनी कॅमेरासमोर हसत पोझ दिली होती. बोनी कपूर आणि शिखरचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि या फोटोची खुप चर्चा आहे. 

बोनी कपूर (Boney Kapoor) आणि शिखर (Shikhar Pahariya) यांना एकत्रित पाहिल्यानंतर अनेकांना जान्हवीच्या रिलेशनशिप स्टेटसचा अंदाज आला. तसेच याआधी या जोडप्याच्या गुप्त व्हेकेशननेही लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे त्यांच्यात नाते असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. 

दरम्यान जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) शिखर पहाडियाच्या (Shikhar Pahariya) आधी ईशान खट्टर, अक्षत राजन आणि ओरहान अवतारानीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र जान्हवीने कधीच तिच्या कोणत्याही नात्याबद्दल कधीही उघडपेण सांगितले नाही.सध्या ती शिखर पहाडियासोबत अफेअरमध्ये असल्याची चर्चा आहे. 

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या नात्याबद्दल काहिच सांगत नसली तरी, बोनी कपूर सोबतचा शिखरचा फोटो आणि याआधी दोघांचे व्हेकेशनचे फोटो खुप काही सांगून जात आहे. त्यामुळे त्या दोघाच्या नात्यांची चर्चा होतेय.