मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जान्हवी कायम तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री यावेळी मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामुळे अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार झाली आहे.
ओप्स मोमेंटला बळी पडणं. हे आता प्रत्येक अभिनेत्रींसाठी खूप सामान्य आहे. नुकतीच जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ऊप्स मोमेंट्सची शिकार झाली आहे. एका इव्हेंटमध्ये जान्हवी नुकतीच स्पॉट झाली होती. ज्यामध्ये जान्हवीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. अभिनेत्रीने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे.
यानंतर जेव्हा अभिनेत्री रेड कार्पेटवर पापाराझीला पोज देण्यासाठी पोहचते. तेव्हा तिचा ड्रेस तिच्या पायात फसला आणि ती ऊप्स मोमेंटची शिकार झाली होती. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या सगळीकडेच खूप व्हायरल होत आहे. याचबरोबर यावेळी परिधान केलेला हा ड्रेस जरा जास्तच बोल्ड आहे. ज्यामुळे अभिनेत्री ऊप्स मोमेंट्सची शिकार झाली आहे. अभिनेत्रीच्या मागच्या बाजूचा कट कॅमेराच कैद होताच ती ट्रोलिंगची शिकार झाली आहे.
कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करुन जान्हवी कपूर तिला प्रचंड ट्रोल करत आहेत, तर अनेकजण तिची तुलना आता उर्फी जावेदशी करु लागले आहेत. अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
एकाने या व्हिडिओवर कमेंट करत लिहीलंय की, याला एक्ट्रा कपडा का दिला जातो? तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, जर संभाळलं नाही जात तर का घालते असा ड्रेस? तर एकाने 'ही कायली जेनर सारखी दिसते' अशी कमेंट केली आहे. तर अजून एकाने म्हटलंय, येवढंच बघायचं बाकी होतं, अजून थोडा मागून कट असलेला ड्रेस घालायचा ना? अशा प्रकारच्या कमेंट करुन अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं आहे. तर काहींनी अभिनेत्रीचं मात्र खूप कौतुक केलं आहे.
जान्हवी वरुण धवनसोबत बवाल या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारीने केलं आहे. लवकरच अभिनेत्री ज्यूनिअर एनटीआरसोबत साऊथ सिनेमातून डेब्यू करणार आहे. याचबरोबर याचबरोबर मिस्टर और मिसेज माहीमध्ये राजकुमार रावसोबत दिसणार आहे.