श्रीदेवींच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूर...

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीला जगाचा निरोप घेऊन ३ महिन्यांहून अधिक काळ लोटला. 

Updated: May 23, 2018, 02:01 PM IST
श्रीदेवींच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूर... title=

मुंबई : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीला जगाचा निरोप घेऊन ३ महिन्यांहून अधिक काळ लोटला. श्रीदेवींच्या अचानक झालेल्या मृत्यूने अनेकांना झटका लागला. तर बॉलिवूड हादरले. श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अलिकडेच त्यांना मॉम या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार स्वीकारण्यासाठी बोनी कपूर दोन्ही मुलींसह दिल्लीला पोहचले. यावेळेस त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आईच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच ती आईबद्दल मीडियाशी बोलत होती.

जान्हवी म्हणते...

३ मे ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा होता. तेव्हाचा हा व्हिडिओ आता भलताच व्हायरल होत आहे. यावेळी जान्हवी मीडियाशी संवाद साधताना म्हणाली की, माझ्या आईने या भूमिकेसाठी घेतलेली प्रचंड मेहनत आणि समर्पणाला पोचपावती दिल्याबद्दल मी आणि खुशी ज्युरी सदस्यांचे आभार मानतो. हे तिच्यासाठी नक्कीच खास आहे. आम्ही खुश आहोत की, आईचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. इतकंच नाही तर जान्हवीने भारत सरकारचेही आभार मानले.

यावर तिने उत्तर देणे टाळले

त्यानंतर जान्हवीला तू तुझ्या आईला मिस करतेस का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने मला याबद्दल काहीही बोलायचे नाही, असे म्हटले आणि तेथून निघून गेली. जान्हवी लवकरच धडक या सैराटच्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे.