माध्यमांसमोरच्या विचित्र वागणुकीमुळे जया बच्चन (jaya bachchan) नेहमीच ट्रोल (Troll) होतात. बहुतेक वेळा त्या कुटुंबीयांसोबत असल्या की फोटोग्राफर्सना पाहून त्यांना राग अनावर होतो. आता जया बच्चन यांनी त्यांच्या अशा वागण्याचे कारण सांगितले आहे. जया यांनी त्यांची नात नव्याच्या (Navya Naveli) व्हॉट द हेल नव्या या पॉडकास्टमध्ये (Podcast) याबद्दल भाष्य केलं आहे. जेव्हा कोणी तिच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतं तेव्हा तेव्हा मला त्याचा तिरस्कार वाटतो, असे जया बच्चन (jaya bachchan) म्हणाल्या.
'मी अशा लोकांचा तिरस्कार करतो जे माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात आणि खोटे बोलून पोट भरतात. मी त्यांना नेहमी सांगायचे की तुम्हाला लाज वाटत नाही का?' असेही जया बच्चन (jaya bachchan) म्हणाल्या. यानंतर जेव्हा नव्याने त्यांना विचारले की, जेव्हा त्या अभिनेत्री झाल्या तेव्हा असं घडेल हे माहित नव्हतं का?. यावर जया बच्चन म्हणाल्या की, 'नाही, मी हे कधी केले नाही आणि याचे समर्थनही केले नाही. मला याचं खूप वाईट वाटतं.'
जया बच्चन पुढे म्हणाल्या की, ' ही आजची गोष्ट नाही. मी पहिल्या दिवसापासून अशीच आहे. तुम्ही माझ्या कामाबद्दल बोलायला हरकत नाही. तुम्ही मी खूप वाईट अभिनेत्री आहे आणि वाईट चित्रपट केले आहेत. तसेच मी चांगली दिसत नाही असं म्हणा. पण या व्यतिरिक्तच्या इतर गोष्टींमुळे मला फरक पडतो.'
ट्रोल करणाऱ्यांबाबतही जया बच्चन यांनी भाष्य केले आहे. 'जर लोकांनी माझी संतापजनक विधाने यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्ट करून पैसे कमावले तर मला फरक पडेल. तुम्ही माझ्या चित्रपटांवर, माझ्या राजकारणावर भाष्य करता, पण माझ्या वैयक्तिक स्वभावावर तुम्ही कधीच प्रश्नचिन्ह लावू शकत नाही. लोक म्हणतात की मी नेहमी रागावलेली असते. राग कशाचा? मी कुठेतरी जात असताना, तुम्ही मला मध्येच थांबवून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करता. मी कुठेतरी जात आहे म्हणून तुम्ही माझे फोटो क्लिक करत... असं का? मी माणूस नाही का?' असे जया बच्चन म्हणाल्या.
सेलेब्सचे व्हिडिओ एडिट करून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर टाकले जातात, असेही जया म्हणाल्या. मग तुम्हाला या गोष्टीचे स्वातंत्र्य आहे का? मग माझ्या स्वातंत्र्याचे काय? मला माहित आहे लोक कमेंट करतात कारण त्यांना माहित आहे की प्रतिक्रिया येतील आणि मग चर्चा होईल. गेल्या आठवड्यातच जया बच्चन आणि नव्या एकत्र स्पॉट झाल्या होत्या. यादरम्यान जेव्हा फोटोग्राफर्स त्यांचे फोटो क्लिक करू लागले तेव्हा त्या भडकल्या होत्या.