OTT की थिएटर, Jhund सिनेमा कुठे पाहता येणार? दिग्दर्शक नागराज मंजुळेनं दिलं उत्तर

झुंड (Jhund) लवकरच ओटीटीवर (OTT) रिलीज होणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होती.  

Updated: Jan 23, 2022, 04:39 PM IST
OTT की थिएटर, Jhund सिनेमा कुठे पाहता येणार? दिग्दर्शक नागराज मंजुळेनं दिलं उत्तर  title=
ट्विटर

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan)  यांचे अनेक सिनेमे रिलीज होण्यासाठी तयार आहेत. मात्र त्या अनेक सिनेमांपैकी बहुचर्चित आणि प्रतिक्षित सिनेमा म्हणजे (Jhund)  झुंड. झुंड लवकरच ओटीटीवर रिलीज होणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होती. मात्र ती निव्वळ चर्चाच ठरली. हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना संक्रमणामुळे ती तारीख पुढे ढकलण्यात आली होती. झुंडचे दिग्दर्शन नागराज मंजुळे  (Nagraj Manjule) यांनी एका मुलाखतीदरम्यान हा सिनेमा ओटीटीलर रिलीज होणार की सिनेमागृहात, याबाबत स्पष्टच सांगितलं. (jhund fim directed by nagraj manjule will be where relesed ott or theaters director given answred)

"झुंड'साठी खूप संघर्ष करावा लागतोय. मात्र यानंतरही योग्य वेळी सिनेमा थेटरमध्ये प्रदर्शित करू, असं नागराज यांनी स्पष्ट केलं. झुंड थेटरमध्ये रिलीज व्हावा, अशी स्वत:ची इच्छा आहे आणि त्यासाठी मी झगडत आहे. माझ्यासोबत संपूर्ण क्रु मेंबर आहेत. योग्य वेळ आल्यावर झुंड थेटरमध्ये प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करेन", असं नागराज मंजुळे यांनी नमूद केलं. ते हिंदुस्तान टाईम्ससोबत बोलत होते. 

'बिग बी' प्राध्यापकाच्या भूमिकेत 

दरम्यान या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी 'स्लम सॉकर'चे संस्थापक विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे. बिग बी प्राध्यपकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत, जे झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल टीम तयार करण्यासाठी प्रेरित करतात आणि त्यांना जगण्याचा उद्देश देतात.