close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अखेर उलगडणार बिग बींसोबत झळकलेल्या अभिनेत्रीच्या गुढ मृत्यूचं रहस्य

आत्महत्या की हत्या हाच प्रश्न वारंवार उपस्थित होत होता.

Updated: Aug 19, 2019, 01:36 PM IST
अखेर उलगडणार बिग बींसोबत झळकलेल्या अभिनेत्रीच्या गुढ मृत्यूचं रहस्य

मुंबई : बिग बी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या सोबत बॉलिवूडमध्ये एका अशा अभिनेत्रीने पदार्पण केलं, जिच्या सौंदर्यावर अनेकजण भाळले. `निःशब्द` या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली ती आभिनेत्री म्हणजे जिया खान. बॉलिवू़डमध्ये आपली ओळख प्रस्थापित करु पाहणारी जिया फार लवकर काळाच्या पडद्या आड गेली. सहा वर्षांपूर्वी स्वत:च्या राहत्या घरातच गळफास लावून घेत तिने आयुष्य संपवले आणि सर्वांनाच `निःशब्द` केले.

प्रियकर आणि अभिनेता सुरज पंचोली सोबत झालेल्या वादानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जाते. त्यानंतर ३१ जानेवारी २०१८ मध्ये सुरजवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा आरोप दाखल करण्यात आला. हे प्रकरण अद्यापही धुमसतच आहे. 

जिया खानचा मृत्यू आणि तिच्यासोबतच कायमस्वरूपी शांत झालेल्या अनेक गोष्टी या साऱ्यावर एका लघुपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे. 'डीएनए'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एक लोकप्रिय टीव्ही ब्रॉडकास्टरने जियाच्या निधनावर लघुचित्रपट साकारण्याची इच्छा व्यक्त केली. 

त्याचप्रमाणे या लघुचित्रपटाच्या कथेवर काम करण्यास देखील सुरूवात झाली आहे. हा लघुपट तीन भागांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

आमिरसोबतही झळकली होती जिया... 
बिग बींसोबत रुपेरी पडद्यावर आलेल्या जियाने अभिनेता अमिर खानसोबत 'गजनी' चित्रपटातही काम केलं होतं. त्यानंतर ती अभिनेता अक्षय कुमार सोबत 'हाऊसफुल' चित्रपटात दिसली. चित्रपट आणि बॉलिवूड वर्तुळात यशाच्या उच्च शिखरावर पोहोचण्याआधीच जियाने वयाच्या २५व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता.