सिंघमची ही अभिनेत्री झाली आई, मुलाला दिला जन्म

अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला आहे. चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे.

Updated: Apr 19, 2022, 08:36 PM IST
सिंघमची ही अभिनेत्री झाली आई, मुलाला दिला जन्म title=

Kajal Aggarwal Blessed With Baby Boy : अजय देवगणसोबत 'सिंघम' चित्रपटात काम करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल आई झाली आहे. ही आनंदाची बातमी ऐकून काजलच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. पिंकविलाने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, काजलने मुलाला जन्म दिला. मात्र, काजल आणि तिचा पती गौतम किचलू यांनी आई-वडील झाल्याची अधिकृत माहिती दिलेली नाही. पण चाहत्यांनी आतापासूनच या जोडप्याचे अभिनंदन करायला सुरुवात केली आहे.

काजल अग्रवालने २०२२ च्या सुरुवातीला एका पोस्टद्वारे चाहत्यांना तिच्या गरोदरपणाची माहिती दिली होती. गर्भधारणेच्या काळात ती खूप सक्रिय होती. तिने पती गौतम किचलूसोबत बेबी बंप फ्लॉंट करताना फोटोशूट देखील केले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती. आता चाहते काजल अग्रवाल आणि गौतम किचलूच्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काजल अग्रवालचा फेब्रुवारीमध्ये बेबी शॉवर सोहळा पार पाडला, ज्याचे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले. या सोहळ्यात काजल गुलाबी रंगाच्या बनारसी साडीत खूपच सुंदर दिसत होती. तिच्या पारंपारिक लूकची खूप चर्चा झाली. गरोदरपणात काजल स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा करायची आणि चाहत्यांना फिटनेस टिप्सही देत ​​होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gautam Kitchlu (@kitchlug)

काजल अग्रवालने 30 ऑक्टोबर 2020 रोजी गौतम किचलूशी लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाच्या फंक्शन्समध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. काजलचा नवरा गौतम हा फिल्म इंडस्ट्रीतील नसून एक बिझनेसमन असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला दोघांची मैत्री झाली आणि नंतर बघता बघता या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केले.