मुंबई : सध्या काजोलचा एका कार्यक्रमातला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका इव्हेंटसाठी निघालेली काजोल अचानक चालता चालता पडली. आणि चाहते, बॉडीगार्ड सगळे पाहतच राहीले. व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल की, तोल गेल्यानंतर काजोल स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करते पण तिला ते शक्य होत नाही. व्हिडिओ पाहुन असे वाटते की, पडल्यानंतर तिला चांगलेच लागले असेल. हा व्हिडिओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण काजोलचं पडणं हे काही पहिल्यांदा नाही. या अगोदर देखील काजोलचा एका भर कार्यक्रमात तोल गेला होता.
2015 मध्ये शाहरूख खान, काजोल, वरूण धवन आणि कृती सेनचा 'दिलवाले' हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्या सिनेमाच्या प्रमोशनच्यावेळी एका कार्यक्रमात काजोलचा हाय हील सँडलमुळे तोल गेला. तेव्हा काजोल अगदी वाईटप्रकारे पडली असती पण तेव्हा तिला अभिनेता वरूण धवनने खूप चांगल सावरलं. जर वरूणने योग्यवेळी काजोलला आधार दिला नसता तर ती चांगली आपटली असती. भर कार्यक्रमात हा प्रकार घडल्यामुळे सुरूवातीला काजोल थोडी गोंधळली. पण नंतर तिने हसत स्वतःला सावरलं. आताचा काजेलचा मॉल मधला पडलेला व्हिडिओ हा काही पहिला नाही. त्यामुळे या व्हिडिओसोबतच वरूण धवनने सावरेला व्हिडिओ देखील पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हे पण वाचा : व्हिडिओ :... आणि काजोल पाय घसरून धपकन पडली
जोलच्या या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काजोल आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिचा चार्म अजूनही कायम आहे. काजोल सोशल मीडिया चांगलीच अॅक्टीव्ह असते. नवनवे फोटोज ती सोशल मीडियावर सातत्याने शेअर करत असते. पण या व्हिडिओने मात्र काजोल थोडी नाराज झाली आहे.