Kajol, राणी मुखर्जीचा भाऊ सम्राट मुखर्जीला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Samrat Mukherjee Arrest : काजोल आणि राणी मुखर्जीचा भाऊ सम्राट मुखर्जीला अटक करण्यात आलीय. सम्राटवर भरधाव वेगाने कार चालवत दुचाकीस्वाराला धडक दिलीय. 

नेहा चौधरी | Updated: Aug 21, 2024, 10:20 AM IST
Kajol, राणी मुखर्जीचा भाऊ सम्राट मुखर्जीला अटक; काय आहे नेमकं प्रकरण? title=
kajol rani mukerji cousin samrat mukherjee arrested

Samrat Mukherjee Arrest : राणी मुखर्जी (Rani Mukerji) आणि काजोल (Kajol) यांचा चुलत भाऊ आणि बंगाली अभिनेता सम्राट मुखर्जी (Samrat Mukherjee) प्रकाश झोतात आला. कारण मात्र वाईट आहे, कोलकाता (Kolkata Police) इथे अटक करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी दक्षिण-पश्चिम कोलकातामधील बेहाला भागात झालेल्या अपघातानंतर अटक करण्यात आली. सम्राट भरधाव वेगाना कार चालत एका मोटारसायकलला धडकल्याचा आरोप करण्यात आलाय. (kajol rani mukerji cousin samrat mukherjee arrested)

नेमकं काय प्रकरण आहे?

'पीटीआय'ने दिलेल्या माहितीनुसार, सम्राटने ज्या टूव्हीलरला धकड दिली तो 29 वर्षीय तरुन विद्यासागर कॉलनी, बेहालामधील रहिवासी आहे. अपघातात त्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत. घटनेनंतर तरुणाला जवळच्या एम.आर. बांगूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी एसकेएम रुग्णालयात हलवण्यात आलंय. या अपघातानंतर कोलकाता पोलिसांनी सम्राट मुखर्जीला अटक केलीय. चौकशीचा भाग म्हणून सम्राटला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलंय. 

प्रत्यक्षदर्शी आणि दुचाकीस्वार काय म्हणाला?

घटनेची माहिती देताना दुचाकीस्वाराने सांगितलं की, सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तो घरी परतत असताना चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्याला धडक दिली, त्यामुळे तो बेशुद्ध झाला. तर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलं की, सम्राट मुखर्जी हे बेहाला चौरस्त्यावरून टोलीगंगेच्या दिशेने जात असताना त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे ही धडक झाली. मोटारसायकलवर आदळल्यानंतर त्यांची कारही जवळच्या घरावर आदळल्यामुळे भिंतीला तडा गेलाय. 

सम्राट मुखर्जीने कोणत्या चित्रपटात काम केलं?

काजोल, राणी मुखर्जी, तनिषा मुखर्जी आणि 'ब्रह्मास्त्र'चा दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचा चुलत भाऊ सम्राट मुखर्जी यांनीही अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय. बंगाली चित्रपटासोबत त्याने बॉलिवूडमधील 'राम और श्याम', 'भाई भाई', 'जंजीर', 'सिकंदर सडक का' आणि 'हम हैं राही कर के' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.