कंगनाला Y श्रेणीची सुरक्षा, गृहमंत्री अमित शाहंचे मानले आभार

९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत येणार 

Updated: Sep 7, 2020, 12:05 PM IST
कंगनाला Y श्रेणीची सुरक्षा, गृहमंत्री अमित शाहंचे मानले आभार

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतला व्हाय (Y) श्रेणीची सुरक्षा देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गृह मंत्रालयाकडून ही सुरक्षा देण्यात आली आहे. कंगना रानौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात ट्विटरवॉर झाले होतं. यामध्ये संजय राऊतांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला होता. यावर कंगनाने हे चॅलेंज स्विकारून मी ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचे सांगितले. 

कंगनाने याबाबत ट्विटर करून गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. हे प्रमाण आहे की, कोणत्याही देशभक्ताचा आवाज रोखला जाऊ शकत नाही. मी अमित शाह यांची आभारी आहे. परिस्थिती पाहता ते मला काही दिवसांनी मुंबईत येण्याचा सल्ला देऊ शकत होते. त्यांनी भारताच्या मुलीने दिलेल्या वचनांचा मान ठेवला. माझ्या स्वाभिमान आणि आत्मसम्मनाची लाज राखली, असं ट्विटर कंगनाने केलं आहे. 

कंगना ९ सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे. या कारणाने तिला व्हाय सिक्युरिटी देण्यात आली आहे. मुंबईत कंगनाला येऊ देणार नसल्याचा इशारा शिवसेने दिला होता. 

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर अभिनेत्री कंगना  राणौतला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी चांगलेच सुनावले आहे. हा वाद आता अत्यंत टोकाला जावून पोहोचला आहे. शिवाय कंगना आणि संजय राऊत यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाप्रती अपशब्द वापरल्यामुळे  कंगनाने त्यांना ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. देशातील मुलगी तुम्हाला माफ करणार नाही, असं म्हणतं तिन राऊतांवर टीका केली आहे.