कंगनाच्या 'धाकड'चा टीझर प्रदर्शित

कंगना लवकरच 'धाकड'मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Updated: Aug 9, 2019, 01:40 PM IST
कंगनाच्या 'धाकड'चा टीझर प्रदर्शित  title=

मुंबई : गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला कंगना रनौतचा 'जजमेंटल है क्या' चित्रपट वादात होता. आता कंगना लवकरच 'धाकड'मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धाकड' चित्रपटाचा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये कंगना लेडी रॅम्बो लूकमध्ये दिसत आहे. तिच्या हातात भारी-भक्कम मशीनगनही दिवस आहे. ती कोणावरतरी गोळ्या  झाडताना दिसत आहे. चित्रपटाच्या टिजरला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. अनेकांनी तिने चित्रपटासाठी केलेल्या प्रयत्नांचं कौतुकही केलं आहे.

रजनीश घई यांनी 'धाकड' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. २०२० मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र अद्याप चित्रपट प्रदर्शनाची तारिख निश्चित करण्यात आलेली नाही.