फोटोज : नेहाच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूड स्टार्सची हजेरी

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा ३८ वा वाढदिवस होता.

Updated: Aug 29, 2018, 08:33 AM IST
फोटोज : नेहाच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूड स्टार्सची हजेरी title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा ३८ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत नेहा पती अंगद बेदीसह उपस्थित होती. त्याचबरोबर अनेक बॉलिवूड स्टार्सने पार्टीला हजेरी लावली. 

Neha Dhupia With husband Angad Bedi

नुकतंच नेहा प्रेग्नेंट असल्याची माहिती खुद्द तिने आणि अंगदने सोशल मीडियावरून दिली. याच वर्षी मे महिन्यात दोघांनी सिक्रेट वेडींग केले. 

Host Karan Johar

नेहाच्या बर्थडे निमित्त करण जोहरने त्याच्या घरीच शानदार पार्टीचे आयोजन केले होते. लॅक्मे फॅशन वीकमध्ये नेहाने बेबी बंपसह अंगदच्या साथीने रॅम्पवॉक केला. नेहा-अंगदच्या लग्नानंतरच नेहा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी नेहा-अंगद मालदिवजमध्ये हॉलिडेजसाठी गेले होते. तेथील धमाल-मस्तीचे फोटोज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

पार्टीला फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा देखील उपस्थित होता.

Celebrity Designer Manish Malhotra

तर अभिनेता वरुण धवनने गर्लफ्रेंड नताशासोबत पार्टीला हजेरी लावली.

Actor Varun Dhawan

बंगाली ब्युटी कोंकणा सेनने देखील पार्टीत वर्णी लावली. नेहा आणि कोंकणा चांगल्या मैत्रिणी आहेत.

Actress Konkona Sen Sharma

सोहा अली खान देखील नेहाला शुभेच्छा देण्यासाठी पोहचली.

Soha Ali Khan

अभिनेता आयुषमान खुराना देखील पत्नीसह पोहचला.

Ayushmaan Khurana

पार्टीला बीग बींची मुलगी श्वेता नंदानेही हजेरी लावली.

Shweta Bachchan Nanda

अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता विक्की कौशल देखील पार्टीला उपस्थित होता. 

Actor Vicky Kaushal