बॉलिवूडमध्ये अजब केमिस्ट्री, तैमूरची 'या' नावासोबत होतेय चर्चा

का होतेय ही चर्चा 

बॉलिवूडमध्ये अजब केमिस्ट्री, तैमूरची 'या' नावासोबत होतेय चर्चा

मुंबई : करिना - सैफच्या तैमूरची कायमच जोरदार चर्चा असते. मग ती त्याची शाळा असो किंवा त्यांचा प्रत्येक लूक. आता तैमूरची एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चा आहे. तैमूर आणि करण जोहरचे ट्विन्स यांची खूप चांगली मैत्री आहे. हे तिघेही सोशल मीडियावर भरपूर लोकप्रिय आहेत. एवढंच काय तर या तिघांच्या फॅनपेज देखील आहे. हल्लीच करण जोहरने एक मोठा खुलासा केला आहे की, त्याची मुलगी रूही करिनाच्या तैमूरला भाऊ मानणार नाही. 

करण जोहर आता एक रेडिओ शो 'कॉलिंग करण' होस्ट करत आहे. या शोवर करणने सांगितलं की, रूहीची आया सारखं बोलते की, तैमूरला तू दादा बोल मात्र करण जोहर याच्या विरोधात आहे. यावर नैनी म्हणजे आया बोलते की, आपण का त्यांना नात्यात फूट निर्माण करत आहोत. 20 वर्षानंतर जर तैमूर आणि रूहीला एकत्र राहायचं असेल तर काहीपण होऊ शकतं. 

 

PLAY DATE!!!!!

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

तैमूर आणि करण जोहरच्या ट्विन्ससोबतच सोहा अली खानची मुलगी इनाया, शाहिदची मीशा कपूर, शाहरूख चा मुलगा अबराम यांची देखील सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. अनेकदा ही मुलं मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद होतात. पण या सगळ्यात तैमूरची चर्चा जास्त असते. त्यांच दिसणं त्याच्या प्रत्येक हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या जातात.