Karan Johar Viral Video: करण जोहर हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत (Karan Johar) असतो. कधी स्टार कीड्सवरून तर कधी आपल्या कॉफी विथ करण (Coffee With Karan) या शोमुळे. सध्या करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो जोरदार व्हायरल होत आहे. त्यातून या शोमधील अनेक गोष्टी, गप्पा, किस्से व्हायरल होतात. परंतु सतत चर्चेत असणारा करण जोहर हा आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. (karan johar shares a new video of her children on instagram netizens reacts)
चित्रपट निर्माता, होस्ट आणि अभिनेता करण जोहरने ट्विटरवरून निवृत्ती घेतली असली तरी तो इन्स्टाग्रामवर (Karan Johar Instagram Video) खूप सक्रिय आहे. करण जोहर इन्स्टावर अॅक्टिव्ह असतो आणि अनेकदा फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. करण जोहरने आपल्या मुलांचा एक व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये यश आणि रुही (Karan Johar Kids) करणं गाताना अत्यंत वाईट गातो म्हणून कानाला हात लावून घेतात. या व्हिडीओवरून करण सध्या खूपच ट्रोल होत आहे. (Karan Johar Trolled)
आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे
करण जोहरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करण जोहरची दोन्ही मुले यश आणि रुही दिसत आहेत, तर व्हिडिओ रेकॉर्ड करताना फक्त करण जोहरचा आवाज ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की यश करणला म्हणतो की तू इतके वाईट का गातोस? यावर करण म्हणतो की, मी खूप छान गातो, निदान मला तरी तसं वाटतं. यानंतर करण मुलांना विचारून 'अभी ना जाव चोरके...' गाणे सुरू करतो. करणचे गाणे ऐकून यश आणि रुहीने कानावर हात ठेवले. करण म्हणतो की अरे निदान माझं गाणं ऐका तरी.. पण त्यावर ते दोघं मात्र त्याला नकार देतात.
व्हिडिओ शेअर करताना करण जोहरने कॅप्शनमध्ये लिहिले - 'माझ्या घरात या मधुर आवाजाचा (माझा) कोणीही चाहता नाही.' करण जोहरचा हा व्हिडीओ सिनेजगताशी निगडित स्टार्सनी खूप पसंत केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडिओला लाईक आणि कमेंटही केल्या आहेत. सोनाली बेंद्रेने कमेंट विभागात रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे, तर महीप कपूर आणि राजीव अडातिया यांनी हसणारा इमोजी शेअर केला आहे.
आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'
एकीकडे सेलेब्स या व्हिडिओला पसंती देत आहेत, तर दुसरीकडे करणही या व्हिडिओमुळे ट्रोल होत आहे. करण जोहरच्या गायनाच्या प्रतिभेची ट्रोल्सनी खिल्ली उडवली आहे. एका ट्रोलने लिहिले- 'करणची मुलेही त्याचे गाणे ऐकू शकत नाहीत, तर हे दुसर्याने लिहिले- 'करण, आता निदान तुझ्या मुलांसाठी तरी गाणे गाऊ नकोस.'