स्टारकिडला लाँच केल्यामुळे करण जोहर पुन्हा ट्रोल

 शनाया कपूरला बॉलिवूडमध्ये एन्ट्री दिल्यामुळे करण जोहर ट्रोल       

Updated: Mar 23, 2021, 08:15 AM IST
स्टारकिडला लाँच केल्यामुळे  करण जोहर पुन्हा ट्रोल

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अत्महत्येनंतर बॉलिवूडमधील गटबाजी आणि घराणेशाहीमुळे सिनेजगतातील कलाकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं. आता पुन्हा सोशल मीडियावर घराणेशाहीमुळे वाद पेटला आहे. त्याला कारणही तसचं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने कपूर कुटुंबातील  मुलगी शनाया कपूरसाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडे करून दिले आहेत. त्यामुळे 'पुन्हा एकदा स्टारकिड' अशी चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. 

शनायाही  संजय कपूरची मुलगी आहे. जुलै महिन्यात शनायाचा पहिला सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. करण सोशल मीडियावर शनायाच्या बॉलिवूड एन्ट्रीची माहिती दिली. त्यामुळे आता करणला नेटकरी ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर करणला 'नेपोटिझमचा देवता'  अशी उपाधी दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करण जोहर शनायाला बॉलिवूडमध्ये ब्रेक देणार आहे. शनाया Dharma Cornerstone Agencyसोबत काम करणार आहे. करण जोहरने यासंदर्भातील माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. शिवाय करणने शनायाचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले. 

बातमी : http://स्टारकिडला लाँच केल्यामुळे करण जोहर पुन्हा ट्रोल

शनाया कपूरच्या आधी करणने आलिया भट्ट, वरुण धवन, जान्हवी कपूर, ईशान खट्टर, अनन्या पांडे या स्टारकिडला बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. असं देखील कळतं आहे की, करण खूशी कपूर आणि अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खानला देखील लाँच करणार असल्याची चर्चा आहे.