नॅशनल अवॉर्ड जिंकल्यानंतर कंगनाची रानौत पहिली प्रतिक्रिया

कंगनाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल 

Updated: Mar 23, 2021, 08:03 AM IST
नॅशनल अवॉर्ड जिंकल्यानंतर कंगनाची रानौत पहिली प्रतिक्रिया

मुंबई : आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आता यशाच्या शिखरावर आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने आपल्या वाढदिवसाला 'थलायवा' सिनेमाचा ट्रेलर लाँच केला. या पाठोपाठ कंगनाने चाहत्यांना आणखी एक सरप्राईज दिलं. 

सोमवारी आयोजित 67 व्या राष्ट्रीय पुरस्कारात अभिनेत्री कंगना रानौतला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'मणिकर्णिका' आणि 'पंगा' या दोन सिनेमांकरता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबाबत कंगनाने सोशल मीडिया एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

कंगनाने या पुरस्काराकरता प्रसून जोशी, शंकर एसान लॉयसह सिनेमातील कास्ट आणि क्रूचे आभार मानले आहेत. 

दोन-दोन सिनेमांकरता मिळाला अवॉर्ड 

कंगनाला एका सिनेमाकरता नाही तर दोन दोन पुरस्काराकरता नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. चौथ्यांदा कंगनाच्या नावावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर लागली आहे. 2010 मध्ये पहिल्यांदा कंगनाला 'फॅशन' सिनेमाकरता सहाय्यक अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला. 

त्यानंतर 2015 मध्ये कंगनाला 'क्वीन' सिनेमाकरता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर तिसऱ्यांदा 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' सिनेमाकरता 2016 मध्ये कंगनाला पुरस्कार मिळाला. आता 2021 मध्ये कंगनाला दोन सिनेमांकरता अवॉर्ड मिळाला आहे.