Vanity Van मध्ये करण जोहरला हव्याच असतात 'या' गोष्टी; Video समोर येताच चर्चांना उधाण

अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या करण जोहरला Vanity Van मध्ये हव्याच असतात; त्यानेच व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती... करण जोहरची Vanity Van पाहून  तुम्हाला देखील बसणाार नाही विश्वास  

Updated: Nov 28, 2022, 04:07 PM IST
Vanity Van मध्ये  करण जोहरला हव्याच असतात 'या' गोष्टी; Video समोर येताच चर्चांना उधाण title=

Karan Johar Vanity Van : दिग्दर्शक करण जोहर (karan johar) कायम त्याच्या हटके अंदाजामुळे ओळखला जातो. करणची ड्रेसिंग स्टाईल कायम चर्चेत असते. कायम हटके कपडे घालणारा आणि रॉयल आयुष्य जगणाऱ्या करणची प्रत्येक गोष्ट प्रचंड महागडी आहे. (karan johar kids) आता करणने एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये करणने त्याच्या भव्य  Vanity Van ची एक झलक दाखवली आहे. करणची  Vanity Van महागड्या वस्तूंनी सजवण्यात आली आहे. शिवाय Vanity Van मध्ये अशा पाच गोष्टी आहेत ज्या करणला त्याच्या Vanity Van मध्ये हव्याच असतात. (karan johar life style)

करणला त्याच्या Vanity Van मध्ये लागणाऱ्या गोष्टी

करणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत करणने त्याला Vanity Van मध्या लागणाऱ्या गोष्टींबद्दल सांगितलं आहे. करणला Vanity Van मध्ये ग्लासेस, उश्या, जॅकेटसाठी वेगळी जागा, कॉफी मशीन, मायक्रोवेव या पाच गोष्टी लागतात. Vanity Van चा व्हिडीओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये 'या जागेमध्ये जे काही आहे ते माझं आहे आहे...' असं लिहिलं आहे. (karan johar news)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करणच्या Vanity Van चा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही. करण जोहरच्या (karan johar social media) चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे करण काय खातो? कोणत्या ठिकाणी राहतो? कसं आयुष्य जगतो? त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी करणचा चाहता वर्ग उत्सुक असतो. (karan johar show)

करण कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करण कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. (karan johar rapid fire)

करणचे आगामी सिनेमा
'ए दिल हैं मुश्किल' सिनेमानंतर करण 'रॉकी और राणी की प्रेम कहानी' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि धर्मेंद्र (dharmendra) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमा 2023 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.