करीना कपूरमुळे सुरू झाली होती सलमान - ऐश्वर्याची लव्हस्टोरी

काय आहे हे प्रकरण 

करीना कपूरमुळे सुरू झाली होती सलमान - ऐश्वर्याची लव्हस्टोरी

मुंबई : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान 21 सप्टेंबर रोजी आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. करीनाने 2000 मध्ये रिफ्यूजी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. करीनाने आपल्या करिअरमध्ये अनेक सिनेमे रिजेक्ट केले. करीनाने सोडलेले अनेक सिनेमे ब्लॉकबस्टर झाले. 1999 साली आलेला हम दिल दे चुके सनम हा संजय लिला भन्साळीचा सिनेमा. या सिनेमातील नंदनी या कॅरेक्टर करता देखील करीनाला कास्ट करण्यात आलं होतं मात्र तिने हा रोल नाकारला आणि मग तो ऐश्वर्या रायला देण्यात आला. 

भन्साळी यांनी जेव्हा करीनाची आई बबिता हिला याबाबत सांगितलं तेव्हा त्यांनी तिच्या शिक्षणाचं कारण पुढे केलं. आणि त्यानंतरच हा रोल ऐश्वर्याला देण्यात आला. आणि याच सिनेमा दरम्यान सलमान आणि ऐश्वर्याची ओळख झाली आणि त्यांच अफेअर सुरू झालं. 

करिनाच्या नावासंबंधीचा देखील एक मेजदार किस्सा आहे. जेव्हा बबिता करीनाच्या वेळी गरोदर होती तेव्हा ती अन्ना करोनिना नावाचं पुस्तक वाचत होती. बबिताला हे पुस्तक आणि अन्नाचं कॅरेक्टर इतकं आवडलं की त्यांनी तिचं नाव करीना ठेवलं. तसेच करीनाच्या नावे फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक रोचक रेकॉर्डदेखील आहे. करीना एक अशी अभिनेत्री आहे जिने पाच खानसोबत काम केलं आहे. हे पाच खान म्हणजे - शाहरूख, सलमान, आमिर, सैफ आणि इमरान खान