'कृपया लाल सिंग चड्ढावर...', सिनेमाला होणारा विरोध पाहाता चक्क बेबो करतेय प्रेक्षकांना विनंती

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करीनानं प्रेक्षकांना ही विनंती केली आहे. 

Updated: Aug 13, 2022, 10:48 AM IST
'कृपया लाल सिंग चड्ढावर...',  सिनेमाला होणारा विरोध पाहाता चक्क बेबो करतेय प्रेक्षकांना विनंती title=

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच, चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर 'लाल सिंग चड्ढा' ट्रेन्ड करत होता. पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळालेला थंड प्रतिसाद पाहून या चित्रपटाचे शो रद्द झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता अभिनेत्री करीना कपूरनं (Kareena Kapoor Khan) हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना विनंती केली आहे. 

आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

करीना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहायला हवा कारण यासाठी आमिर आणि तिनं तीन वर्षांची प्रतिक्षा केली आहे. या मुलाखतीत करीनाला होस्टनं तिला विचारलं की, तुझ्या वक्तव्याचा असाअर्थ काढण्यात आला की ती प्रेक्षकांना गृहीत धरत नाही. यावर करीना म्हणाली, फक्त इंटरनेटवर असलेले लोकच चित्रपटाला ट्रोल करत आहेत. दुसरीकडे, तिच्या चित्रपटाला मिळणारं प्रेम हे वेगळं आहे असं तिला वाटत असल्याचं करीनानं सांगितलं. 

आणखी वाचा : King Cobra ला Kiss करण्यासाठी मुलीनं केलं असं काही, पुढे जे घडलं ते पाहून बसेल धक्का

पुढे करीना म्हणाली, लोकांनी चित्रपटाला बॉयकॉट (#BoycottLalSinghChadha) करायला नको कारण हा खूप सुंदर चित्रपट आहे. तर तिला आणि आमिरला प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर पाहायला हवे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती करत करीना म्हणाली, चित्रपटाला बॉयकॉट करू नका, कारण एका चांगल्या चित्रपटाला बॉयकॉट करायला नको. या चित्रपटासाठी 250 लोकांनी अडीच वर्षांसाठी मेहनत केली आहे. 

आणखी वाचा : आमिरच्या #BoycottLalSinghChadha वर मिलिंद सोमणचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला...

दरम्यान, चित्रपटानं पहिल्या दिवशी 12 कोटी रुपयांचा गल्ला केला आहे. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे अनेक शो रद्द करण्यात आले होते.