छोट्या खानचा फोटो शेअर करत करीना म्हणाली...

तैमूर स्टारकिड्सच्या यादीत अव्वल आहे.   

Updated: May 9, 2021, 01:51 PM IST
छोट्या खानचा फोटो शेअर करत करीना म्हणाली...

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान दोन मुलांची आई आहे. तिच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर अली खान आहे. पण तिच्या दुसऱ्या मुलाचं नाव अद्याप कळालं नाही. तैमूर स्टारकिड्सच्या यादीत अव्वल आहे. सोशल मीडियावर कायम त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण आता तर मातृदिनाचं औचित्य साधत करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाचा देखील फोटो सोशल मीडियावर पस्ट केला आहे. या फोटोत तैमूर आणि त्याचा छोटा भाऊ दिसतं आहे. तैमूरने त्याच्या छोट्या भावाल पकडले आहे. 

तैमूर आणि त्याच्या छोट्या भावाचा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'आज  संपूर्ण जग फक्त आशेवर अवलंबून आहे. उद्याचा दिवस नक्कीचं चांगला असेल अशी आशा मला हे दोघे देत आहेत...' असं लिहीलं आहे. सध्या सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल होत आहे. 

शिवाय तिने विश्वास ठेवा असं सांगत सर्व मातांना शुभेच्छा दिल्या आहेत. मातृदिनाच्या शुभेच्छा देत करीना म्हणाली, ' सगळ्या सुंदर आणि सामर्थ्यवान आईंना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा' सध्य करीनाची ही पोस्ट सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे.