मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान गेल्या 22 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सतत काम करत आहे. लवकरच ती आमिर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. मात्र, करीनाचे खरे नाव काहीतरी वेगळे होते हे फार कमी लोकांना माहीत आहे.
2000 मध्ये करीना कपूर खानने 'रिफ्युजी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी करीना कपूर खानने यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही.
लोक करिनाला 'बेबो' या नावानेही ओळखतात पण तिचे खरे नाव करीना नसून दुसरे काहीतरी होते हे तुम्हाला माहीत आहे का?
करीना कपूरचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी झाला होता आणि रणबीर कपूरची मोठी बहीण रिद्धिमाचा जन्म करिनाच्या जन्माच्या अवघ्या 6 दिवस आधी झाला होता. त्यावेळी गणपती उत्सवाचे वातावरण होते, त्यामुळे आजोबा राज कपूर यांनी ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या मुलीचे नाव रिद्धिमा ठेवले होते.
रिद्धिमानंतर 6 दिवसांनी करीनाचा जन्म झाला तेव्हा राज कपूरने तिचे नाव सिद्धिमा ठेवले. राज कपूर यांनी त्यांच्या दोन्ही नातींची नावं गणेशाच्या पत्नींच्या नावावरून ठेवली होती.
बबिता आणि रणधीर कपूर यांना त्यांच्या मुलीचे सिद्धिमा हे नाव आवडले नाही, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव करीना ठेवले.