Kareena Kapoor ने शेअर केला Inaaya Khemu आणि तैमुरचा 'तो' फोटो

सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांची मुलगी इनाया नौमी खेमूचा ५वा वाढदिवस साजरा केला आहे.

Updated: Sep 30, 2022, 03:34 PM IST
Kareena Kapoor ने शेअर केला  Inaaya Khemu आणि तैमुरचा 'तो' फोटो title=

मुंबई : सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांची मुलगी इनाया नौमी खेमूचा ५वा वाढदिवस साजरा केला आहे. या खास प्रसंगी, करीना कपूर खानने तिच्या भाचीसाठी एक सुंदर इच्छा शेअर केली आहे. करीना कपूरने इन्स्टाग्रामवर तैमूरसोबत इनायाचा फोटो पोस्ट केला आणि त्यावर एक सुंदर कॅप्शन लिहिलंय.

करीनाने हे फोटो पोस्ट करत लिहिलंय की, "तुम्ही दोघं काय प्रार्थना करत आहात हे मला माहित नाही... आज तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल..... तुम्ही दोघंही खूप केक खाऊ शकता ठीक आहे, तुमची आई हे वाचत आहे आणि ती मला मारणार आहे...हॅपी बर्थडे प्रिन्सेस इनाया...तुला खूप प्रेम." करिनाच्या या सुंदर पोस्टवर सबा पतौडीनेही कमेंट केली आहे. ति कमेंटमध्ये लिहिलं, "मुंचकिन्स को प्यार करो महशा' महशाअल्लाह 5व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा इन्नी जान."

सोहा अली खानची बहीण सबाने वाढदिवसाच्या मुलीसाठी एक सुपर क्यूट पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं: "इन्नी जान. एक..चार पर्यंत, आणि माशाअल्लाह आता तु  5 वर्षांची आहेस! हे वर्षे किती लवकर निघून गेलं...  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोहा अली खान ही ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि पतौडीचे दिवंगत नवाब मन्सूर अली खान यांची मुलगी आहे, जे भारतातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. रंग दे बसंती, मुंबई मेरी जान, दिल मांगे मोर, खोया खोया चांद, साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न्स आणि घायाल: वन्स अगेन यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी सोहा ओळखली जाते.