फ्रीज शिवाय महिला त्यांचं किचन विचारच करु शकतं नाही. महिलांसाठी हा फ्रीजमध्ये त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो. वेगवेगळे अन्नपदार्थांपासून शिजवलेले अन्न आपण यात स्ट्रोर करतो. भाज्या फळं हे अनेक दिवस आपण याच ठेवतो आणि गरजेनुसार ते दररोज वापरत असतो. चपाची असो किंवा भात असो किंवा भाजी आपण शिजवल्यानंतर उरल्यास ते फ्रीजमध्ये ठेवतो. (chapati or rice how long is food stored in the fridge safe health tips) खरं तर कायम ताजे अन्न खावे असं तज्ज्ञ सांगतात.
आज महिला घरासोबत ऑफिसमध्येही काम करतात. त्यामुळे ही तारेवरची कसरत करताना हा फ्रीज म्हणजे त्यांच्यासाठी संजीवनी असतो. ते अनेक पदार्थ शिजवून या फ्रीजमध्ये ठेवतात. अगदी फळं कापून फ्रीजमध्ये ठेवले जातात. पण फ्रीज हे शेवटी एक यंत्र आहे. यात ठेवलेले पदार्थ नेमकं किती दिवस आपल्या शरीरासाठी सुरक्षित आहे, याबद्दल विचार केला का? आज आपण त्याच बद्दल बोलणार आहोत.
रेफ्रिजरेटरमध्ये शिजवलेला भात हा सर्वात सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारा अन्न मानला गेला आहे. पण तुम्हाला तांदूळातील पोषण तुमच्यासाठी शरीरासाठी द्यायचे असेल आणि पचनक्रिया नीट ठेवायची असेल तर. फ्रीजमध्ये ठेवलेला भात हा दोन दिवसात संपल्या पाहिजे.
अनेक जण फ्रीजमध्ये चपातीदेखील ठेवतात. या चपात्या साधारण आठवडाभर चांगल्या राहतात. या चपाती फ्रीजमध्ये काढल्यानंतर तूप लावून गरम करुन खाल्ल्या पाहिजे असं तज्ज्ञ सांगतात. पण ही चपाती आपल्या शरीरासाठी पौष्टिक नसते. यामुळे आपल्याला पोटदुखीची समस्या होऊ शकते. पण तरीदेखील फ्रीजमधील चपाती 12 ते 14 तासांच्या आत खायला पाहिजे.
अनेक वेळा डाळ किंवा आमटी उरले की आपण फ्रीजमध्ये ठेवता. हे पदार्थ 2 दिवसांच्या आत संपवले पाहिजे. दोन दिवसांनंतर हे पदार्थ खाल्ल्यास पोटात गॅसची समस्या निर्माण होते.
शिजवलेले कडधान्य हे दोन दिवसाच्या आत संपवले पाहिजे कारण त्यानंतर त्यांचं सेवन केल्यास पोटाचे आजार होऊ शकतात.
अनेक घरात फळ कापून फ्रीजमध्ये ठेवली जातात. खरं तर फळं खाण्याची एक विशिष्ट वेळ असते आणि फळं कायम ताजी खावीत. कारण फळं चिरून ठेवल्यास ती दुषित होतात आणि आपल्या शरीरासाठी ती चांगली नसतात.
चिरलेली पपई ही 6 तासांच्या आत संपवली पाहिजे. पपई कापल्यानंतर 8 तासांनंतर ती दूषित होण्यास सुरुवात होते. 12 तासांनंतर खाल्ल्याने आपल्यासाठी ती हानिकारक ठरते. ती आपल्या शरीरात मंद विषाचं काम करते.
सफरचंद कापल्यानंतर बराच वेळ ठेवल्यास त्यात ऑक्सिडेशन होण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्याचा वरचा थर काळा पडतो. जरी त्यात कोणतेही लक्षणीय नुकसान नसलं तरी सफरचंद कापल्यानंतर 4 तासांच्या आत त्याचं सेवन केलं पाहिजे. शिवाय इतर कापलेली फळं ही 6 ते 8 तासांनंतर खाऊ नयेत.
अगदी भांड्यात पूर्णपणे झाकून ठेवलेल्या फ्रिजमध्ये शिजवलेल्या भाज्या 24 तासांच्या आत त्यांचं सेवन करावं. जर तुम्ही खाण्याच्या सवयींशी संबंधित अशा चुका नियमितपणे करत असाल तर तुम्हाला अन्नातून विषबाधा होण्याची भीती असते. तुमची पचनसंस्था कमकुवत होते आणि तुम्हाला वारंवार आजारांना सामोरे जावे लागतं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)