करीना कपूर पुन्हा एकदा 'दुल्हन'

करीना कपूर तैमूरच्या जन्मानंतर पुन्हा एकदा सिनेमांकडे वळताना दिसली. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 30, 2017, 02:12 PM IST
करीना कपूर पुन्हा एकदा 'दुल्हन' title=

मुंबई : करीना कपूर तैमूरच्या जन्मानंतर पुन्हा एकदा सिनेमांकडे वळताना दिसली. 

गरोदरपणातही करिनाने काम केलं होतं. आता तैमूरच्या जन्मानंतर पुन्हा एकदा ती कामाकडे वळली आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर करीनाने पुन्हा एकदा आपल्या शरिराकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. आणि पुन्हा ती आपल्या झिरो फिगरमध्ये दिसू लागली आहे. असं सगळं असताना करिना कपूर पुन्हा एकदा आपल्याला वधुच्या सुंदर रूपात दिसली आहे. 

तिने हे फोटोशूट खास सेलिब्रिटी डिझाइनर मनीष मल्होत्रासाठी केलेलं आहे. मनीषच्या या सुंदर पेहेरावात करीनाचा ग्लॅमरस लूक आणखी उठावदार दिस आहे. पाहा तिचे हे खास फोटो 

Kareena Kapoor Khan is in Manish Malhotra bridal series see pics

करीना कपूर मुलगा तैमूर अली खानच्या जन्मानंतर पुन्हा एकदा फिटनेसकडे भरपूर लक्ष देताना दिसत आहे. आणि आता ती पुन्हा एकदा तिच्या जुन्या फिगरमध्ये दिसत आहे. आता या अंदाजात करीनाने पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. 

Kareena Kapoor Khan is in Manish Malhotra bridal series see pics

हे फोटोशूट करिनाने बॉलिवूडचा चाहता फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रासाठी केलेलं आहे. मनीष मल्होत्राच्या ब्रायडल कलेक्शनला दाखवण्यासाठी या सुंदर वधूच्या वेशात करीना दिसत आहे. हे फोटोशूट हार्पर बाजार ब्राइड मॅगझीनने केले आहे. 

Kareena Kapoor Khan is in Manish Malhotra bridal series see pics

या वेस्टर्न ब्रायडलच्या सिरिजमध्ये मनीष मल्होत्राने जास्त करून सफेद, आइस ब्ल्यू आणि ग्रे शेड्सचा वापर केला आहे. तसेच या रंगाच्या कपड्यांमध्ये करिना अगदी सुंदर दिसत आहे. एका ड्रेसमध्ये ब्लाऊजपासून एक ट्रोलदेखील आहे. 

Kareena Kapoor Khan is in Manish Malhotra bridal series see pics

हल्लीच केनियाची राजधानी नारोबीमध्ये फॅशन शो दरम्यान सेलिब्रिटी डिझाइनर मनीषसाठी करिना रॅम्प व़क करताना दिसली. यावेळी करिनाने व्हाइट आणि बेज रंगाचा लेहंगा परिधान केला होता. 

Kareena Kapoor Khan is in Manish Malhotra bridal series see pics

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये करिना आई झाली होती. मुलगा तैमूर अली खान जन्माला आल्यानंतरच करिनाने आपल्या शरिराकडे लक्ष द्यायला सुरूवात केली होती. यावर्षात अनेकदा करिना जीमच्या बाहेर दिसली होती. आणि तिचे हे फोटो व्हायरल देखील झाले होते. 

Kareena Kapoor Khan is in Manish Malhotra bridal series see pics

करीना पुन्हा एकदा 'वीर दी वेडिंग' या सिनेमापासून कमबॅक करत आहे. या सिनेमांत तिच्यासोबत करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी दिसत आहे. या सिनेमाचं शूटिंग दिल्ली आणि थायलंडमध्ये करण्यात आलं आहे. हा सिनेमा २०१८ मध्ये रिलीज होत आहे.