बिग बींच्या समोर नि:शब्द झाले इस्राईलचे पंतप्रधान

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी बॉलिवूड कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सारा नेतन्याहू देखील उपस्थित होत्या. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 19, 2018, 09:47 AM IST
बिग बींच्या समोर नि:शब्द झाले इस्राईलचे पंतप्रधान title=

मुंबई : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी बॉलिवूड कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सारा नेतन्याहू देखील उपस्थित होत्या. 

बॉलिवूडवर प्रेम

इस्राईलच्या पंतप्रधानांनी म्हटलं की, जग बॉलिवूडवर प्रेम करतं. इस्राईल बॉलिवूडवर प्रेम करतं. मला वाटायचं की मी खूप मोठी व्यक्ती आहे. पण अमिताभ यांना भेटून मला त्यांचा प्रभाव कळाला. मी नि:शब्द आहे. त्यांच्याकडे माझापेक्षा 3 कोटीहून अधिक ट्विटर फॉलोअर्स आहेत.

बिग बींची सेल्फी 

या दरम्यान अमिताभ बच्चन यांनी बेंजामिन नेतन्याहू, सारा नेतन्याहू आणि बॉलिवूड कलाकारांसोबत एक सेल्फी देखील घेतली. अमिताभ यांची ही सेल्फी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ऐश्वर्याने केलं स्वागत

बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा नेतन्याहू यांचं स्वागत ऐश्वर्या राय बच्चनने गुलदस्ता देऊन केलं. प्रोड्यूसर-डायरेक्टर करण जौहर आणि यूटीवीचे सीईओ रॉनी स्क्रूवाला यांनी त्यांचं स्वागत केलं.

बॉलिवूडकरांची हजेरी

अमिताभ बच्चन यांनी जेव्हा सेल्फी घेतली तेव्हा मंचावर ऐश्वर्या, अभिषेक बच्चन, करण जौहर, सुभाष घेई, इम्तियाज अली, रॉनी स्क्रूवाला, सारा अली खान आणि बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होते.