'राजा हिंदुस्तानी'मध्ये सर्वात जास्त वेळ चाललेला किसिंग सीन, करिश्मा कपूर थरथरत होती

1996मध्ये प्रदर्शित झालेला 'राजा हिंदुस्तानी' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.

Updated: May 6, 2021, 02:32 PM IST
'राजा हिंदुस्तानी'मध्ये सर्वात जास्त वेळ चाललेला किसिंग सीन,  करिश्मा कपूर थरथरत होती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेता आमिर खानची जोडी बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसली. पण 1996मध्ये प्रदर्शित झालेला 'राजा हिंदुस्तानी' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. २४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. एका खास सीनमुळे हा चित्रपट बराच चर्चेत आला होता.

1996 साली आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. चित्रपटाच्या सीनची बरीच चर्चा झाली. करिश्मा आणि आमिरमधील 'किसिंग सीन' बराच चर्चेत होता.  या सीन विषयी स्वत: करिश्माने एका मुलाखतीदरम्यान एक खुलासा केला होता की, हा सीन शूट करताना ती थरथर कापत होती.

एका मुलाखती दरम्यान करिश्मा म्हणाली होती, ''राजा हिंदुस्थानी बद्दल बर्‍याच आठवणी आहेत. जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा चित्रपटाचा' किसिंग सीन 'लोकांमध्ये खूप चर्चेत होता. कदाचित अनेकांना हे माहित नसेल की, हा सीन शूट करण्यासाठी आम्हाला तीन दिवस लागले. मी थरथर कापत होते. आणि मी विचार करत होते की, हा किसींग सीन केव्हा संपेल? कारण फेब्रुवारी महिन्यात ऊटीमध्ये भरपूर थंडी होती आणि संध्याकाळी ६ वाजता हा सीन चित्रित झाला होता''.

आमिर खान आणि करिश्मा कपूर स्टारर 'राजा हिंदुस्तानी' सिनेमा 15 नोव्हेंबर 1996 रोजी रिलीज झाला होता. त्यावेळी हा चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट झाला होता. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. या चित्रपटाचं दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केलं आहे. या चित्रपटात करिश्मा आमिर शिवाय सुरेश ओबेरॉय, अर्चना पूरन सिंग, जॉनी लीव्हर, फरीदा जलाल सारख्या कलाकारांनीही काम केलं होतं.

या सिनेमाची कथा एका शहरातील श्रीमंत मुलीची आणि एका टॅक्सी चालकाच्या लव्हस्टोरीवर आधारित आहे. चित्रपटात करिश्मा तिच्या वाढदिवसादिवशी मित्र-मैत्रिणींसोबत सुट्टीवर जाते. त्याचवेळी ती, राजा नावाच्या टॅक्सी चालकाला भेटते. याचदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. या सिनेमांत करिश्माच्या वडीलांचा या लग्नाच्या विरोध असतो. मात्र तरीही ती आमिरशी लग्न करते. चित्रपटाची खरी कहाणी ईथूनच सुरू होते. चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद मिळाला होता.