भन्साली यांच्या आईवर करणी सेना सिनेमा काढणार

हा चित्रपट याचं वर्षी प्रदर्शित केला जाईल, तसेच या चित्रपटाचं नाव ‘लीला की लीला’ असेल.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 27, 2018, 06:29 PM IST
भन्साली यांच्या आईवर करणी सेना सिनेमा काढणार title=

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या आईवर चित्रपट काढणार असल्याचं, पद्मावतला विरोध करणाऱ्या करणी सेनेनं आता म्हटलं आहे. या चित्रपटाची घोषणा करणी सेनेचे जयपूरचे जिल्हाध्यक्ष गोविंद सिंह खांगरोट यांनी केली आहे.

चित्रपटाचं पटकथा लेखन सुरु

संजय लीला भन्साळी यांच्या आईवरील चित्रपटाचं पटकथा लेखन सुरु झाल्याचंही त्यांनी सांगितलं. हा चित्रपट याचं वर्षी प्रदर्शित केला जाईल, तसेच या चित्रपटाचं नाव ‘लीला की लीला’ असेल, अशी घोषणा देखील करणी सेनेनं या आधीच केली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार

राजस्थानमध्ये या चित्रपटाचं चित्रिकरण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आलीय. करणी सेनेनं, यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत असल्याचंही म्हटलं आहे.