'दोस्ताना 2' चित्रपटातून काढल्यानंतर Kartik Aaryanची पहिली पोस्ट

 'दोस्ताना 2' चित्रपटातून काढल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत होते. 

Updated: Apr 24, 2021, 07:46 AM IST
'दोस्ताना 2' चित्रपटातून काढल्यानंतर Kartik Aaryanची पहिली पोस्ट

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)ला दिग्दर्शक करण जोहरच्या 'दोस्ताना 2' चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर कार्तिक सोशल मीडियापासून दूर होता. त्यामुळे कार्तिकच्या चाहत्यांना सतत चिंता सतावत होती. चाहत्यांच्या चिंतेमागे कारण देखील गंभीर आहे. गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्यां केली. जेव्हा त्याने आत्महत्या केली तेव्हा त्याला इंडस्ट्रीमधून बॅन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. ज्यामुळे सुशांतला मानसिक त्रास देखील झाला. 

एकंदर पाहाता आता कार्तिक आर्यनला देखील करण जोहरच्या 'दोस्ताना 2' चित्रपटातून काढण्यात आलं आहे. त्यामुळे कार्तिकचे चाहते काळजीत होते. सोशल मीडियावर अनेक लोक कार्तिकच्या बाजूने उभे होते. कारण कार्तिक सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याने एकही पोस्ट केली नव्हती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

आता बऱ्याचं दिवसांनंतर कार्तिकने अखेर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये मास्क लावला आहे. पण त्याने फोटोला कॅप्शन दिलेलं नाही. सांगायचं झालं तर 'दोस्ताना 2' चित्रपटात कार्तिकसोबत अभिनेत्री जान्हवी कपूर झळकणार होती, पण आता कार्तिकच्या जागी अभिनेता राजकुमार राम किंवा विकी कौशलची वर्णी लागू शकते. 

या प्रकरणावर अभिनेत्री कंगना रानौतने आवाज बुलंद केला होता.  'कार्तिक आर्यन स्वतःच्या मेहनतीवर इथंपर्यंत पोहोचला आहे. तो पुढेही असचं करेल. वडील जो आणि त्यांची नेपो गँग क्लबला विनंती आहे. कार्तिकला एकट्याला सोडा. कार्तिकच्या मागे लागू नका नाहीतर तो सुशांतसारखा फासावर लटकण्यासाठी लाचार होईल.' असं म्हणत कंगनाने करण जोहर आणि बॉलिवूडमधील गटबाजी आणि घराणेशाहीवर टीका केली.