कतरिनाच्या साक्षीने vicky kaushal कडून चाहत्यांना गुडन्यूज

विकी कौशलचा 'सरदार उधम' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून इंटरनेटवर याची बरीच चर्चा होत आहे. 

Updated: Oct 16, 2021, 01:08 PM IST
कतरिनाच्या साक्षीने vicky kaushal कडून चाहत्यांना गुडन्यूज

मुंबई : विकी कौशलचा 'सरदार उधम' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून इंटरनेटवर याची बरीच चर्चा होत आहे. या चित्रपटात स्वातंत्र्य सेनानी सरदार उधम सिंह यांचे जीवन दाखवण्यात आले आहे.

सरदार उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला ब्रिटिश जनरलकडून घेतला. विकी कौशलने चित्रपटात उधम सिंग यांची भूमिका साकारली आहे. 

या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग जवळच्या व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार पोहोचले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

विकी कौशलला शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री कतरिना कैफने न चुकता हजेरी लावली. काही दिवसांपूर्वीच कतरिना भारतात परतली आहे. या स्क्रिनिंगसाठी तिने अगदी कॅज्युअल लुक केला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

काही दिवसांपासून कतरिना अभिनेता विकी कौशलला डेट करत असल्याची चर्चा पसरली आहे, तर इकडे कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​यांनी देखील एकत्र या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.