विकी कौशल नव्हेतर त्याच्या भावासाठी कतरिनाकडून खास गोष्ट

कतरिना कैफचं नाव आजकाल अभिनेता विक्की कौशलसोबत खूप जोडलं जात आहे

Updated: Sep 28, 2021, 06:01 PM IST
 विकी कौशल नव्हेतर त्याच्या भावासाठी कतरिनाकडून खास गोष्ट

मुंबई : कतरिना कैफचं नाव आजकाल अभिनेता विक्की कौशलसोबत खूप जोडलं जात आहे. जरी दोघंही यावर काहीही बोलत नसले तरी ते म्हणतात ना की धूर फक्त तिथूनच निघतो जिथे आग लागते. बरं ते काहीही असो, पण आता ताजी बातमी अशी समोर येत आहे की, कतरिना कैफने विकीचा धाकटा भाऊ सनी कौशलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्या सुद्धा सोशल मीडियावर.

Add Zee News as a Preferred Source

कतरिनाने एक विश केलं आणि सनीने उत्तर दिलं
इन्स्टाग्रामवर सनीचा फोटो पोस्ट करत कॅतरिना कैफने कॅप्शनमध्ये लिहिलं, वाढदिवसाच्या शुभेच्छा सनी. तुझा प्रत्येक दिवस उज्ज्वल, मजेदार आणि प्रेमाने परिपूर्ण होवो. त्याचबरोबर सनी कौशलने पोस्ट रिपोस्ट करत लिहीलं आहे की, 'धन्यवाद कतरीना.'

अलीकडेच, कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या साखरपुड्याच्या बातमीनेही खूप हंगामा केला. गेल्या महिन्यात, बातम्या आल्या होत्या की, दोघांनीही कुटुंबाच्या उपस्थितीत लग्न साखरपुडा केला आहे, मात्र त्याच दिवईश संध्याकाळी अखेर ही बातमी मावळली. आणि एक अफवा आहे यावर शिक्कामोर्बत झाला.

 

नंतर सनी कौशनने स्वतः या बातमीवर त्याच्या कुटुंबाची प्रतिक्रिया सांगितली. त्याने सांगितलं की, जेव्हा त्याच्या कुटुंबीयांना हे कळलं तेव्हा ते खूप हसले, त्यांनी विकी कौशलला सांगितलं की तुझी एंगेजमेंट झाली आहे, आता तू मिठाई दे. अशा शब्दात विकीची घरात मस्करी करण्यात आली होती.

About the Author