Amitabh Bachchan यांच्यावरही आर्थिक संकट; 'या' गोष्टीवर भागवली भूक

Amitabh Bachchan यांनी 'कौन बनेगा करोडपती' च्या शोमध्ये हा खुलासा केला आहे. 

Updated: Nov 19, 2022, 10:53 AM IST
Amitabh Bachchan यांच्यावरही आर्थिक संकट; 'या' गोष्टीवर भागवली भूक title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ हे सध्या 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) चे सुत्रसंचालन करत आहेत. यंदाचं 'कौन बनेगा करोडपती' चं हे 14 वं(KBC 14) सीझन आहे. कौन बनेगा करोडपतीमध्ये स्पर्धकांशी गप्पा मारताना दिसतात. अनेक वेळा ते त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधीत अनेक गोष्टी सांगतात. यावेळी अमिताभ यांनी त्याच्या स्ट्रगलिंग दिवसांविषयी सांगितले आहे. 

हेही वाचा : Vicky Kaushal चा 'गोविंदा नाम मेरा' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित!

अमिताभ बच्चन केबीसीच्या मंचावर पुन्हा एकदा त्यांचे जुने दिवस आठवले. खरंतरक्विझ शो दरम्यान स्पर्धकाला व्हिक्टोरियन मेमोरियलबद्दल विचारण्यात आले. स्पर्धकाला उत्तर दिल्यानंतर अमिताभ यांनी त्यांचे कोलकात्त्याचे दिवस आठवले. अमिताभ (Amitabh Bachchan Struggle Days) यांनी त्यांचे स्ट्रगलिंग दिवस सांगत, व्हिक्टोरिया मेमोरियलजवळ एक गेट आहे, जिथे जगातील सर्वोत्तम गोलगप्पा मिळतात असे सांगितले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काय म्हणाले अमिताभ पाहा - 

याविषयी पुढे सांगत अमिताभ म्हणाले,'आमच्यासारखे लोक ज्यांचा पगार 300-400 रुपये महिना होता. आम्ही जेव्हा तिथे काम करायचो तेव्हा खाण्यापिण्याची खूप अडचण व्हायची. त्यावेळी पानी पूरीवर जगत होतो. त्याची किंमत 2 ते 4 आणे असायची आणि त्यात ते पोट भरून खायचे. (kaun banega crorepati amitabh bachchan remembers old struggle days says only ate golgappas)