9 वर्षाच्या पहाडी मुलाच्या गोष्टी ऐकून अमिताभ बच्चन पोट धरुन हसले, पाहा व्हिडीओ

'कौन बनेगा करोडपती 13' शो सध्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक आहे.

Updated: Nov 25, 2021, 05:47 PM IST
9 वर्षाच्या पहाडी मुलाच्या गोष्टी ऐकून अमिताभ बच्चन पोट धरुन हसले, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती 13' शो सध्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक आहे, ज्याला अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. या शोमध्ये सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्व लोकं भाग घेण्यासाठी येतात. परंतु अमिताभ बच्चन यांच्यासोमर बसणं आणि त्यांच्यासोबत बोलणं हे या लोकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्यामुळे बऱ्याच लोकांच्या तोंडातून शब्द देखील निघत नाही. परंतु जेव्हा 9 वर्षाचा मुलगा 'बिग बी' समोर आला तेव्हा मात्र काही उलटंच चित्र पाहायला मिळालं.

या 9 वर्षाच्या लहान मुलाच्या बोलण्यासमोर बिग बींनी देखील गप्प राहणच योग्य समजलं आहे.

बिग बींची बोलती बंद

खरं तर, यावेळी 'कौन बनेगा करोडपती 13' या लोकप्रिय शोमध्ये हिमाचल प्रदेशातील एक 9 वर्षांचा गोंडस मुलगा कंटेस्टंट म्हणून हॉट सिटवरती बसणार आहे. अरुणोदाई शर्मा असे या मुलाचे नाव आहे आणि हा लहान मुलगा फारच बडबड्या आहे. ज्यामुळे तो त्याच्या बोलण्याने कोणाचेही बोलणे बंद करू शकतो. 

या भागाचा प्रोमो आऊट झाला आहे, ज्यामध्ये तुम्ही या मुलाचा नटखट स्वभाव पाहू शकता. या प्रेमोमध्ये सुरूवातीला बिग बी अरुणोदय सोबत हिमाचली डान्स करताना दिसत आहे.

त्यानंतर बिग बी अरुणोदयला विचारतात की तुला अरुणोदय म्हणू की… तेवढ्यात अमिताभ बच्चन यांचा मुद्दा कापून अरुणोदय म्हणतो की, 'काय फरक पडतो? तुम्ही मला काही ही म्हणा, पण निदान तुम्ही मला हाक मारा'. यानंतर अमिताभ हसतात आणि म्हणतात, "तुला खेळाचे नियम पटकन सांगतो.' यावर अरुणोदय म्हणतो, 'सर जेव्हा तुमच्याकडे काहीही बोलण्यासारखे नसते तेव्हा तुम्ही खेळाचे नियम सांगायला सुरुवात करता, मी हे पाहिले आहे."  त्यानंतर अरुणोदयच्या या बोलण्यावर सगळेच हसायला लागतात.

एवढेच नाही तर प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन प्रेक्षकांना सांगत आहेत की, अरुणोदयसमोर तोंड उघडण्याची चूक कधीही करू नका. यावरही अरुणोदय मजेशीरपणे उत्तर देतो. 'असं बोलू नका सर, तोंड उघडलं नाही तर हा शो कसा चालेल?'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अरुणोदयच्या या गमतीशीर गोष्टी आज रात्री प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहू शकता. हा प्रोमो शेअर करताना चॅनलने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये लिहिले की, '9 वर्षांच्या अरुणोदय शर्माने 'KBC 13' च्या मंचावर AB सरांना त्यांच्या शब्दांनी शांत राहण्यास भाग पाडले.

अरुणोदयही या शोमध्ये अमिताभ बच्चन यांची नक्कल करताना दिसणार आहे. असे मजेदार क्षण पाहणे प्रेक्षकांसाठी खूप मनोरंजक असेल. विशेष म्हणजे, सध्या 'कौन बनेगा करोडपती 13' मध्ये स्टुडंट स्पेशल वीक सुरू आहे. याच क्रमात हिमाचल प्रदेशचा अरुणोदय शर्मा गेम खेळण्यासाठी 'KBC 13' च्या स्टेजवर पोहोचला.