'करोडपती बनली तर श्रीदेवीसारखं बेडवर नोटा पसरवरून झोपेनं'

तिने अशी काही इच्छा प्रकट केली की खुद्द बिग बी आवाक् झाले. 

Updated: Sep 20, 2018, 08:03 AM IST
'करोडपती बनली तर श्रीदेवीसारखं बेडवर नोटा पसरवरून झोपेनं'

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' हा शो होस्ट अमिताभ बच्चन आणि शोमध्ये  येणाऱ्या हुशार स्पर्धकांमुळे नेहमीच चर्चेत असतो. करोडपती होण्याच्या इच्छेने इथे प्रत्येकजण येत असतो आणि अमिताभ यांच्यासमोर आपली स्वप्न सांगत असतो. बुधवारच्या एपिसोडमध्ये रोलरोवर कंटेस्टंट सोमा चौधरी पुन्हा एकदा दिसणार आहे. तिने अशी काही इच्छा प्रकट केली की खुद्द बिग बी आवाक् झाले.

श्रीदेवीसारखं झोपायचंय

अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मातोडकर यांचा सिनेमा 'जुदाई' तुम्हाला माहित असेल. या सिनेमातील एका सीनमध्ये एक कोटीची रक्कम मिळालेली श्रीदेवी बेडवर पैसे पसरवून झोपते. गृहीणी असलेल्या सोमा चौधरीलादेखील करोडपती बनल्यानंतर असच करायच आहे. अशी इच्छा तिने बोलूनही दाखविली आहे.

लग्नाला होकार 

सोमाने आपल्या आयुष्यातील अनेक मजेदार किस्से यावेळी सांगितले. वयाच्या 22 व्या वर्षी तिचं लग्न झालं. मुलगा बघायला आल्यावर त्याच्यासोबत तिला जास्तवेळ बोलायला मिळालं नाही. पण मुलगा ऑक्टोबरमध्ये जन्मला आहे एवढंच तिच्या वडीलांनी सांगितलं होतं आणि तिने लगेच होकार दिला.

आपल्यावर प्रेम करणाऱ्या मुलाचा जन्म ऑक्टोबरमधला असेल असं तिच्या कुंडलीत लिहिल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे तिने लग्नाला होकार दिला.