KBC 14 : कविता चावला यांचं 7 कोटी 50 लाख रुपये जिंकण्याचं स्वप्न अधुरं, जाणून घ्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही

Kbc 14 Season : 7 कोटी 50 लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे कविता यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला.  

Updated: Sep 20, 2022, 11:28 PM IST
KBC 14 : कविता चावला यांचं 7 कोटी 50 लाख रुपये जिंकण्याचं स्वप्न अधुरं, जाणून घ्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही title=

मुंबई : कोल्हापूरच्या कविता चावला (Kavita Chawala) या 'कौन बनेगा करोडपती 14' (KBC 14) या मोसमातील एक कोटी रुपये जिंकणाऱ्या पहिल्या स्पर्धेक ठरल्या. विशेष म्हणजे कविता केबीसीमध्ये 1 कोटी जिंकणाऱ्या कोल्हापुरातल्या पहिल्या महिला ठरल्या.  मात्र त्यांचं 7 कोटी 50 लाख जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. 7 कोटी 50 लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे कविता यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला. (kbc 14 season kaun banega crorepati kolhapur contenstat kavita chawala quit show due to not answered for 7 crore 50 lakh ruppes question answer)

7 कोटी 50 लाख रुपयांसाठी विचारलेला प्रश्न 

7 कोटी 50 लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी स्पर्धकांना कोणतीही लाईफलाइन दिली जात नाही. सुरुवातीच्या सीझनमध्ये स्पर्धकांनी 7 कोटींसाठी विचारलेल्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्यास त्यांची विजयी राशीत थेट  3 लाखांवर यायची. 

मात्र केबीसीच्या या मोसमात स्पर्धकाने या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिलं तरी त्याला किमान 75 लाख रुपये दिले जाणार आहेत. कविता यांना 'प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पणात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय असलेल्या गुंडप्पा विश्वनाथनने (Gundappa Vishwanath) कोणत्या संघाविरुद्ध ही कामगिरी केली होती?' असा प्रश्न विचारण्यात आला. 

या प्रश्नाच्या उत्तरासाठी सर्व्हिस, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि सौराष्ट्र असे 4 पर्याय ठेवण्यात आले होते. मात्र कविता यांना या प्रश्नाचं उत्तर ठावूक नव्हतं. त्यामुळे त्यांनी क्विट करण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचे अचूक उत्तर आंध्र हे होते. गुंडप्पा विश्वनाथ यांनी 1967 मध्ये म्हैसूरकडून रणजीत पदार्पण केलं होतं. या सामन्यात त्यांनी आंध्रप्रदेश विरुद्ध 230 धावांची द्विशतकी खेळी केली होती.