Khatron Ke Khiladi 12 : 'खतरों के खिलाडी 12'मध्ये स्टंट करताना निशांत भट जखमी, फोटो समोर

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर निशांत भट्ट आता 'खतरों के खिलाडी 12' या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.

Updated: Jun 18, 2022, 08:30 PM IST
Khatron Ke Khiladi 12 : 'खतरों के खिलाडी 12'मध्ये स्टंट करताना निशांत भट जखमी, फोटो समोर  title=

मुंबई : 'बिग बॉस 15' मध्‍ये फायनलिस्ट म्हणून समोर आलेला चेहरा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर निशांत भट्ट आता 'खतरों के खिलाडी 12' या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. या शोदरम्यान स्टंट करताना निशांतला खूप त्रास झाला असून त्याच्या खांद्यावर आणि पाठीवर दुखापतीच्या खुणा आहेत. खतरों के खिलाडी 12 या शोमध्ये स्टंट करताना त्याच्या गुडघ्यालाही दुखापत झाली आहे.

सोशल मीडियावर निशांतचे जखमी झाल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. पण त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे निशांतचा स्पोर्टी स्पिरिटने. 'बिग बॉस'मधील निशांतचे काही मित्रही  'KK 12' मध्ये सामील झाले आहेत. त्याने मागील शोमध्ये प्रतीक सहजपालसोबत मैत्रीपूर्ण नातं शेअर केलं आणि या शोमध्येही चाहत्यांना असंच समीकरण पाहायला मिळेल असें सांगितले.

स्टंटपेक्षा प्रँकची भीती
'खतरों के खिलाडी 9' चा विजेता असलेला त्याचा कोरिओग्राफर मित्र पुनीत पाठक यांचा काही सल्ला घेतला आहे का, असं विचारलं असता, निशांत भट्ट म्हणाला, "त्याने मला प्रयत्न करत राहण्याचा सल्ला दिला आहे. मी सर्वांचा आदर करतो. तसंच त्याने मला. एकत्र मजा करत राहण्याचाही सल्ला दिला आहे असं सांगितलं."
 
होस्ट रोहित शेट्टीसोबतचं त्याचं नाते शेअर करताना, निशांत म्हणाला, "या शोमध्ये त्याच्यासोबत काम करायला मी खूप उत्सुक आहे. त्याच्या मार्गदर्शनाची आणि सरळपणाची वाट पाहत आहे. लोक जसे करतात तसे बोलतात ते मला खूप आवडतं. कारण ते नेहमीच चांगल्या गोष्टींमधून येतं. पण मला शोमधील स्टंटपेक्षा त्याच्या खोड्यांबद्दल जास्त काळजी वाटते.''