मुंबई : आजकाल बॉलिवूडच्या कलाकारांपेक्षा स्टार किड्स अधिक चर्चेचा विषय बनलेले आहेत. श्रीदेवींच्या अकाली निधनानंतर त्यांच्या मुली जान्हवी आणि खुशी कपूर यांनीही पुन्हा कामाकडे आपलं लक्ष वळवले आहे.
एकीकडे जान्हवी कपूर 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे तर खुशीदेखील एका इव्हेंटमध्ये नुकतीच दिसली आहे.
खुशी कपूरचा खास लूक सध्या सोशल मीडियामध्ये झपाट्याने व्हायरल होत आहे. खुशी कपूरने शीन एंड पीकॉकचा हाय स्लट कट गाऊन घातला होता.
काळ्या हिल्समधील खुशीचा फोटो इंस्टाग्रामवर शीन एंड पीकॉकच्या ऑफिशिएल अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
17 वर्षीय खुशी कपूरचा PROM लुक चाहत्यांना आवडला आहे. सध्या खुशी मुंबईच्या धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकत आहे.
खुशीसोबतच संजय कपूरची मुलगी शनायादेखील या इव्हेंटमध्ये होती. शनाया चंकी पांडेची मुलगी आणि शाहरूख खानची लेक सुहाना यांची घट्ट मैत्रिण आहे.शनायाला सिंपल राहणं पसंत आहे. मात्र पार्टीतील फोटो खूप स्टायलिश आहेत.