कियारा आडवाणीच्या मावशीसोबत सलमान खानचं कनेक्शन काय?

कियाराची आई जिनेव्हिव्ह सुपरस्टार सलमान खानची बालपणीची मैत्रीण आहे. 

Updated: Jul 31, 2021, 10:37 PM IST
कियारा आडवाणीच्या मावशीसोबत सलमान खानचं कनेक्शन काय?

मुंबई: बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस आणि स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे कियारा अडवाणी. 2014 मध्ये 'फुगली' या सिनेमातून कियाराने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. आता ती सर्वांचीच आवडती अभिनेत्री बनली आहे. कियाराने आपल्या अभिनयाची जादू दाखवत ती वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करु शकते हे दाखवून दिलं आहे. 

कियारा आडवाणी 31 जुलै 2021 रोजी 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्याशी जोडलेल्या ऋकाही रंजक गोष्टींचा आपण उलगडा करणार आहोत, ज्या फार कमी लोकांना माहित असतील. 

कियारा आडवाणीचे वडील जगदीश आडवाणी हे मुंबईत राहणारे सिंधी व्यापारी आहेत. त्याची आई जिनेव्हिव्ह जाफरी एक शिक्षिका आहे. कियारा आडवाणीला एक लहान भाऊ आहे आणि तिचे खरं नाव आलिया आडवाणी आहे. जे नंतर बदलण्यात आले.

कियारा अडवाणीने तिचा पहिला चित्रपट रिलीज होण्याआधीच तिचं नाव आलिया काढून कियारा असं ठेवलं. सलमान खानने कियाराला नाव बदलण्याचा हा सल्ला दिला होता. कारण आलिया भट्ट त्यावेळी चित्रपटांमध्ये आधीच काम करत होती. कियाराचे हे नाव 'अंजाना अंजानी' चित्रपटातील प्रियंका चोप्राच्या भूमिकेवरून घेतलं गेलं आहे.

कियाराच्या कुटुंबात फिल्म इंडस्ट्रीशी संबंध कुणी नाही, पण तिच्या कुटुंबाचा बॉलिवूडच्या 2 मोठ्या कलाकारांसोबत निश्चितपणे संबंध आहे. कियारा आडवाणीचे मामा हमीद जाफरी हे प्रसिद्ध कलाकार सईद जाफरी यांचे लहान भाऊ होते. त्याचे पहिले लग्न कियाराच्या आजीसोबत झाले होतं, त्या ब्रिटिश रहिवाशी होत्या. त्यानंतर हमीद यांनी भारती गांगुलीसोबत दुसरं लग्न केलं. जी अशोक कुमार यांची मुलगी होती. भारतीने कियाराची आई जिनेव्हिव्हचं पालनपोषण केलं, तिला  वाढवलं. 

त्यामुळे कियाराचा आईच्या बाजूने सईद जाफरी आणि अशोक कुमार यांच्याशी तिचा संबंध येतो.

आई सलमानची मैत्रीण

कियाराची आई जिनेव्हिव्ह सुपरस्टार सलमान खानची बालपणीची मैत्रीण आहे. दोघंही वांद्रे येथे राहत होते आणि ते लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. जिनेव्हिव्हनेच कियाराची मावशी शाहीनची भेट सलमान खानसोबत करुन दिली होती. कियाराने एका मुलाखतीत सांगितले होते की, फार पूर्वी सलमान खान मावशी शाहीनला डेट करत होते. 

कियाराच्या मते, सलमान खानचं शाहीन यांच्यासोबत हे पहिलं रिलेशनशीप होतं.