किरण गायकवाड म्हणतोय, ज्याला समजलं, त्याला उमजलं! किरणने शेअर केलेली पोस्ट व्हायरल

'किरण गायकवाड'ने पोस्ट शेअर करत जनतेला एक महत्वपूर्ण संदेश दिला आहे

Updated: Apr 29, 2021, 07:08 PM IST
किरण गायकवाड म्हणतोय, ज्याला समजलं, त्याला उमजलं! किरणने शेअर केलेली पोस्ट व्हायरल title=

मुंबई : ज्याला समजलं, त्याला उमजलं! एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान  वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन  घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य  करणारी देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांसमोर आली, आणि या मालिकेला प्रचंड  लोकप्रियता मिळताना दिसतेय. या मालिकेतील डॉ. अजितकुमार देव  म्हणजेच 'किरण गायकवाड' ह्याने एक पोस्ट शेअर केलीये, त्याने आपल्या सहा फोटोच्या माध्यमातून जनतेला एक महत्वपूर्ण संदेश दिलाय. मास्क घाला हे कानीकपाळी ओरडूनही जे लोक ऐकत नाहीत, त्यांच्यासाठी हे फोटो बरंच काही सांगणारे आहेत. 

किरण ने ह्या पोस्टला "ज्याला समजलं, त्याला उमजलं" अशा आशयाचं कॅप्शन देखील दिल आहे. त्याच्या ह्या पोस्टचं सर्व  स्तरातन कौतुक होतंय. किरण सोशल मिडियावर कायम अॅक्टिव्ह असतो. त्याचे फोटो, रिल्स व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. देवमाणूस ही मालिकेतील सगळीच पात्र कायमच चर्चेत असतात. 

एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भुरळ पाडतो. अल्पावधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड एक असा चेहरा लपला आहे ज्याची कोणीच कल्पना केली नसेल. मात्र लवकरच त्याची सगळी रुप बाहेर पडणार असून लवकरच त्याला अटक देखील होणार आहे. मात्र या मालिकेचा शेवट कधी होणार हे अद्याप गुलदस्यात आहे. शेवटी काय होणार हे पहाण्यासाठी तुम्हाला झी मराठी वाहिनी वरील देवमाणूस ही मालिका पहावी लागणार आहे. 'लागीरं झालं जी' फेम भैय्यासाहेब म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिकेत आहे.