खुशीच्या 'या' टॅटूने वेधलं सर्वांचं लक्ष; काय आहे खास?

श्रीदेवींच्या दोन्ही मुली सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतात.

Updated: Apr 29, 2021, 06:15 PM IST
खुशीच्या 'या' टॅटूने वेधलं सर्वांचं लक्ष; काय आहे खास?

मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही मुलींनी स्वतः सावरलं आहे. श्रीदेवी यांच्यामुली जान्हवी कपूर आणि खुशी  कपूर सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतात. आईच्या निधनानंतर जान्हवी तिचं स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे, तर अद्याप खुशीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेलं नाही. खुशी नुकताचं भारतात आली आहे. खुशीला शनाया कपूर आणि अंशुला कपूरसोबत स्पॉट करण्यात आलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

तेव्हाचं खुशीच्या हातावर असलेल्या टॅटूकडे सर्वांचं लक्ष गेलं. खुशीने 'the rest will work itself out' अशा आशयाचं टॅटू  काढला आहे. नुकताचं कपूर कुटुंबाच्या तीन मुलींना म्हणजेच  खुशी कपूर, शनाया कपूर आणि अंशुला कपूर यांना विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं.

जान्हवी कपूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, जान्हवीने 'धडक' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. 11 मार्च रोजी तिचा 'रूही' चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखस झाला.  रुही या भयपटात जान्हवी भूताच्या भयानक  भुमिकेत दिसली.