मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार किरण खेर कर्करोगाने ग्रस्त झाल्याच्या बातम्या पुढे आल्यानंतर आता अभिनेता आणि किरण खेर यांचे पती अनुपम खेर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अनुपम आणि त्याचा मुलगा सिकंदर खेर यांनी किरण खेरच्या आजारासंदर्भात माहिती दिली.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अनुपम खेर यांनी म्हटलं की, "अफवांमुळे लोकांना त्रास होऊ नये, म्हणून मी आणि सिकंदर सर्वांना सांगू इच्छितो की, किरण मल्टीपल मायलोमा ग्रस्त आहे, जो रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे." ती सध्या उपचार घेत आहे आणि आम्हाला माहित आहे की ती यावर मात करुन येईल.''
पुढे त्यांनी लिहिले की, "आम्हाला आनंद आहे की चांगल्या डॉक्टरांच्या टीमने त्यांची देखभाल केली आहे. ती नेहमीच लढाऊ राहिली आहे आणि नेहमीच कठीण गोष्टींना तोंड दिले आहे. ती सर्वांना प्रेम देते, म्हणूनच तिचे बरेच चाहते आहेत. म्हणूनच तुमचे प्रेम देत रहा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि त्या कायम लक्षात ठेवा. ''
— Anupam Kher (@AnupamPKher) April 1, 2021
आपले भाषण संपवताना अनुपम खेर यांनी लिहिले की, "ती बरी होण्याच्या मार्गावर आहे आणि ज्यांनी तिला पाठिंबा दर्शविला आणि प्रेम दिले त्या सर्वांचे आम्ही आभार मानू इच्छितो." अनुपम आणि सिकंदर. ''
बुधवारी एका विशेष परिषदेत भाजप अध्यक्ष अरुण सूद यांनी किरण खेर यांच्या दीर्घ अनुपस्थितीबद्दल माहिती दिली. किरण खेर या चंदीगडमध्ये बराच काळापासून दिसत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना अरुण सूद म्हणाले की, किरण खेर या गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत चंदीगडमध्येच होत्या.
किरण खेर यांच्या हाताला दुखापत झाल्याने नोव्हेंबरमध्ये त्या रूग्णालयात गेले होते. तेव्हाच त्यांना कर्करोगाची माहिती मिळाली. यानंतर, त्यांना डिसेंबरमध्ये मुंबईत उपचारासाठी आणण्यात आले. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्या रुग्णालयात दाखल नाहीत. पण त्या उपचारासाठी रुग्णालयात जात आहेत.