...म्हणून कियारा शिकतेय 'ही' भाषा

'कबीर सिंग' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री कियारा अडवाणीला चांगलीच लोकप्रियता मिळाली.  

Updated: Nov 26, 2020, 09:14 AM IST
...म्हणून कियारा शिकतेय  'ही' भाषा

मुंबई : 'कबीर सिंग' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री कियारा अडवाणीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता पुन्हा ती एका नव्या थाटणीच्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी ती विशेष मेहनत देखील घेत आहे. चित्रपटातील तिच्या व्यक्तीरेखेला योग्य न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नात सध्या कियारा आहे. त्यामुळे गाझियाबादमध्ये बोलली जाणारी तेथील सथानिक भाषा शिकत आहे. तिच्या आगामी चित्रपटाचं नाव  'इंदु की जवानी' (Indu Ki Jawani) असं आहे. 

चित्रपटासंबंधी कियारा म्हणते की, 'अबीरला माहित आहे ती कियारा कशी चालते, बोलते...' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना कियाराचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. 'इंदु की जवानी' (Indu Ki Jawani) चित्रपटाचं शुटिंग उत्तर प्रदेशच्या गाझीयाबादमध्ये करण्यात आलं आहे. अबीर सेनगुप्ता (Abir Sengupta) यांच्या खांद्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आहे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

शिवाय, बुधवारी चित्रपटातील एका गाण्याचा टीझर देखील लाँच करण्यात आला आहे. आज ते गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गाण्याच्या टीझरमध्ये कियारा 'हिलें टूट गईं' या गाण्यावर ठेका धरताना  दिसत आहे. गुरू रंधावाने या गाण्याला आवाज दिला आहे. गाण्याचं टीजर खुद्द कियाराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. 

दरम्यान चित्रपटात ती एका इंदिरा गुप्ता म्हणजेच इंदू नावाच्या मुलीच्या व्यक्तिरेखेला न्याय देताना दिसणार आहे. जी मुलगी डेटिंग ऍपच्या माध्यमातून आपल्या प्रेमाच्या शोधात असते. परंतू प्रेमाच्या शोधाच्या प्रयत्नात ती एका संकटात सापडते. चित्रपटामध्ये कियारा शिवाय वरुण धवन (Varun Dhawan), अनिल कपूर (Anil Kapoor), नितू कपूर (Neetu Kapoor) आणि यूट्यूबर प्राजक्ता कोली (Prajakta Koli) देखील दिसणार आहेत.