Highest Paid Actress : सामंथा, रश्मिका, पूजा हेगडे की आणखी कोणी? कोण आहे South ची सर्वात महागडी अभिनेत्री?

तुम्ही जर साऊथच्या टॉप अभिनेत्रींची कमाई ऐकाल, तर त्या काही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही जास्त रक्कम घेतात.

Updated: Oct 18, 2021, 01:37 PM IST
Highest Paid Actress : सामंथा, रश्मिका, पूजा हेगडे की आणखी कोणी? कोण आहे South ची सर्वात महागडी अभिनेत्री?

मुंबई : आपल्यापैकी जवळ-जवळ बहुतेक लोक हे बॉलिवूडपेक्षा साऊथ सिनेमे जास्त पाहतात. ज्यामुळे त्यांना बऱ्यापैकी टॉप रेटेड अभिनेत्री आणि अभिनेता ठाऊक आहेत. साऊथ सेलिब्रिटींचे अनेक फॅन फॉलोइंग आहे. तुम्हालाही साऊथच्या काही अभिनेत्री आवडत असतील. परंतु तुम्हाला हे माहित आहेत का, तुमच्या आवडत्या अभिनेत्री एक सिनेमा करायला किती मानधन घेतात. तुम्ही जर साऊथच्या टॉप अभिनेत्रींची कमाई ऐकाल, तर त्या काही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही जास्त रक्कम घेतात. चला तर मग जाणून घेऊया साऊथची कोणीती अभिनेत्री किती मानधन स्वीकारते.

पूजा हेगडे दक्षिण आणि बॉलिवूड दोन्ही क्षेत्रात सक्रिय आहे. जरी तिने बॉलिवूडमध्ये तिला जास्त सिनेमे मिळवले नसले तरी, तिला अनेक तेलुगू सिनेमात काम मिळालं आहे, पुजा 2010 मध्ये पूजा मिस युनिव्हर्सची सेकंड रनर अप ठरली. आज दक्षिणेच्या अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग असलेली पूजा ही सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ती एका चित्रपटासाठी 3.5 कोटी रुपयांपर्यंत मागणी करते.

दक्षिणची सुपरस्टार आणि बाहुबलीची देवसेना म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनुष्का शेट्टीची गणना सर्वाधिक पेड अभिनेत्रींमध्ये केली जाते.अनुष्का एका चित्रपटासाठी सुमारे 2 ते 3 कोटी रुपये घेते आणि निर्माते देखील तिला तिचे मानधन देण्यासाठी मागेपुढे विचार करत नाहीत.

नॅशनल क्रश या नावाने तिच्या चाहत्यांमध्ये ओळखली जाणीरी साऊथची एक्प्रेशन क्विन रश्मिका मंदना देखील जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आज अनेक मोठे निर्माते तिला त्यांच्या चित्रपटात घेण्यासाठी रांगेत उभे आहेत, रश्मिका एका प्रोजेक्टसाठी 3 कोटी रुपये घेते.

दिग्दर्शक जी सुरेश कुमार आणि अभिनेत्री मनेका यांची मुलगी कीर्ती सुरेशनेही तिच्या ड्रेसिंग आणि अभिनयामुळे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कीर्तीला तिच्या दमदार अभिनयामुळे राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग असलेली कीर्ती एका चित्रपटासाठी 2 ते 3 कोटी मानधन घेते.

तर साउथ सेंसेशन समंथा प्रभू तिच्या स्टाईल आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. ती तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 2 कोटी पर्यंत मानधन घेते. रिपोर्ट्सनुसार ती लवकरच बॉलिवूडमध्ये देखील पाऊल ठेवणार आहे.