१ मार्चला होणार 'लग्न कल्लोळ'; चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

सध्या पंचक आणि ओले आले हे दोन मराठी सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहेत. एकीकडे हे सिनेमा धुमाकूळ घालत असताना. आता एका नव्याकोऱ्या सिनेमाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

Updated: Jan 17, 2024, 04:51 PM IST
१ मार्चला होणार 'लग्न कल्लोळ'; चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित  title=

मुंबई : सध्या अनेक सिनेमा रिलीज होण्याच्या वाटेवर आहेत. एकापेक्षा एक सिनेमा रिलीज होत असताना आता नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या नवं नवीन विषयावर सिनेमा येत आहेत.एकीकडे एनिमल सॅम बदादुर सिनेमाची क्रेझ कमी झालेली नसताना मराठीतील ओले आले, पंचक सारखे सुपरहिट सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. आता लग्न हा विषय घेवून एक सिनेमा नवाकोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी मनोरंजनविश्वात गेल्या काही दिवसांपासून नवनवीन चित्रपटांची घोषणा करण्यात येत आहे.

मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या जबरदस्त पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. तिघांच्याही हातात हार असून आता ही वरमाला कोणाच्या गळ्यात पडणार, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तत्पूर्वी या नवीन पोस्टरसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली असून हा 'लग्न कल्लोळ' १ मार्चला होणार आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे. 

'लग्न कल्लोळ' या चित्रपटाच्या नावावरून आणि मोशन पोस्टरवरून हा चित्रपट 'लग्न' या विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे, हे दिसतेय. मात्र आता यात 'कल्लोळ' काय पहायाला मिळणार, याचे उत्तर मात्र चित्रपटच देऊ शकेल. दरम्यान या चित्रपटाचे पोस्टर अतिशय कलरफुल आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, " लग्न... हा विषय तसा म्हटला तर अतिशय जिव्हाळयाचा. हा विषय घेऊन अतिशय सुंदररित्या  या चित्रपटाचे लेखन करण्यात आले आहे. पोस्टरवरून प्रेक्षकांना हा अंदाज आला असेलच की, हा चित्रपट प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहे. यात हसू आहे, आसूही आहेत. त्यामुळे आता या 'लग्न कल्लोळा'त सहभागी होण्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहा.'' 

मराठीसह बॉलीवूड गाजवणारा प्रेक्षकांचा लाडका ‘आपला सिद्धू’ म्हणजे सिद्धार्थ जाधव आता लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याने नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. याचबरोबर या सिनेमात भूषण प्रधान, मयुरी देशमुखदेखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत.