Lalit Prabhakar : पहिल्या सीझनला मिळालेल्या घवघवीत यशानंतर सोनी लिव्ह 13 ऑक्टोबर 2023 पासून 'शांतीत क्रांती सीझन 2' सादर करण्यास सज्ज आहे. तर हास्याच्या डबल डोससाठी तयार राहा कारण या सीझनमध्ये प्रेक्षकांचे आवडते श्रेयस, प्रसन्न व दिनार काही साहसी बाबींचा सामना करणार आहेत. त्यातून प्रेक्षकांचं मात्र मनसोक्त मनोरंजन होईल. 'शांतीत क्रांती 2' च्या शूटिंगदरम्यान प्रसन्नची भूमिका साकारणारा ललित प्रभाकरनं त्याच्या जीवनात पहिल्यांदाच ड्रायव्हर बनत बस चालवण्याचा अनुभव घेतला. अभिनय व संवादामध्ये संतुलन राखत आणि सर्वांच्या सुरक्षिततेची खात्री घेत त्यानं सराईतपणे बस चालवली. हा वेगळा अनुभव कसा होता याविषयी ललित प्रभाकरनं सांगितलं आहे.
हे आव्हानात्मक टास्क करण्याबाबत ललित प्रभाकर म्हणाला, 'या सीझनमध्ये मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच बस चालवण्याचा अनुभव घेतला. मला बस चालवण्याच्या जबाबदारीसह ड्रायव्हिंग करताना संवाद सादर करण्याचे व सीन्स परफॉर्म करण्याचे आव्हान देखील होते. या गुंतागूंतीमध्ये अधिक भर म्हणजे आम्हाला गजबजलेल्या रस्त्यावर शूटिंग करायची होती, जे खूप आव्हानात्मक होते. असे अडथळे असताना देखील आमचे दिग्दर्शक व संपूर्ण टीमने हे आव्हान पूर्ण करण्याच्या माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवला, तसेच सर्वांच्या सुरक्षिततेची खात्री देखील घेतली. मला सांगावेसे वाटते की, बस चालवताना भूमिकेमध्ये सामावून राहणे अत्यंत आव्हानात्मक होते. पण, तो अत्यंत अनोखा अनुभव होता, जो माझ्या स्मरणात सदैव राहिल.'
हेही वाचा : Ganapath Trailer : 2070 मध्ये नेऊन हॉलिवूडची आठवण करून देणार 'गणपत'
भाडीपासोबत सहयोगाने टीव्हीएफद्वारे निर्मित आणि अरूनभ कुमार यांची निर्मिती असलेली सीरिज 'शांतीत क्रांती 2' चे दिग्दर्शक सारंग साठये व पौला मॅकग्लिन आहेत. या सीरिजमध्ये अभय महाजन, अलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी व प्रियदर्शिनी इंदळकर प्रमुख भूमिकेत आहेत. आता तुम्हालाही ही सीरिज पाहण्याची इच्छा झाली असेल तर कधी आणि कुठे पाहाल याविषयी जाणून घेऊया. ही सीरिज तुम्ही 13 ऑक्टोबरपासून पाहू शकता. फक्स सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
|
SA
(20 ov) 117
|
VS |
IND
120/3(15.5 ov)
|
| India beat South Africa by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.