तो माझ्यासाठी काळा दिवस... लता दीदींसोबत २०० हून अधिक गाणी गाणाऱ्या गायकाने सांगितली कटू आठवण

लता दीदी यांनी एकदा या गायकाला गाताना ऐकलं आणि म्हटलं तुझा आवाज अतिशय सुंदर आहे... हे शब्द ऐकून गायकाचं भाग्य उजळलं.... 

Updated: Feb 9, 2022, 07:30 PM IST
तो माझ्यासाठी काळा दिवस... लता दीदींसोबत २०० हून अधिक गाणी गाणाऱ्या गायकाने सांगितली कटू आठवण title=

मुंबई : ९२ व्या वर्षी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र मेरी आवाज ही पैहचान है... म्हणणाऱ्या लता दीदी चिरंतर त्यांच्या गाण्यामुळे आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील. लता दीदी यांनी अनेक पिढीला गाण्याच्या माध्यमातून आनंद दिली. (Lata Mangeshkar Last Memories shared these singer who sung 200 songs with Lata Didi)  अनेक पिढींसोबत गाणं गायलं देखील. असाच एक गायक ज्याने लता दीदी यांच्यासोबत तब्बल २०० हून अधिक गाणी गायली. शेवटच्या काळात भेटण्याची इच्छा देखील व्यक्ती केली. पण ती अधुरीच राहिली. 

आपल्या मधुर आवाजाने ९० च्या दशकाला सुरेल बनवणाऱ्या उदित नारायणचा गळा आजही तसाच आहे. आजही त्यांनी कोणत्याही मंचावर माईक धरला की प्रेक्षकांचे कान आवाजासाठी आतुर होतात.

एकापेक्षा एक सदाबहार गाणी देणारा उदित सध्या लता मंगेशकर यांच्या निधनाने दु:खी आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत त्यांच्याशिवाय लताजींसोबत 200 गाणी कोणी गायली नसतील असा दावा त्यांनी केला.

लता मंगेशकर यांच्यासोबत 'तू मेरे सामने, मैं तेरे सामने', 'मेहंदी लगा के रखना', 'दिल तो पागल है' सारखे अनेक चार्टबस्टर गाऊन उदित नारायण स्वतःला खूप भाग्यवान समजतात.

लता दीदींची आठवण करून ते म्हणाले, मी स्वतःला भाग्यवान समजतो. लता दीदींसोबत मला जेवढे काम मिळाले तेवढे काम माझ्या काळातील इतर कोणत्याही गायकाला मिळाले असेल असे मला वाटत नाही.

मला वाटते की मी एकमेव गायक आहे ज्याने लता दीदींसोबत 200 हून अधिक गाणी गायली आहेत. मी लता दीदींसोबत लाइव्ह शो देखील केले आहेत, मला त्यांच्यासोबत आठ वेळा स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली.

उदित नारायण यांनी असेही सांगितले की, लता दीदीं त्यांना नेहमी सांगायच्या की 'उदित तुझा आवाज मूळ आहे'. लता दीदींनी इतकं बोलणं म्हणजे त्यांच्यासाठी आई सरस्वतीचा आशीर्वाद आहे.

ते म्हणाले की 6 फेब्रुवारी 2022 हा काळा दिवस आहे ज्या दिवशी आपण भारतरत्न गमावला गेला.