बॉलिवूड अभिनेत्रीला दुसऱ्यांदा पुत्ररत्न

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अभिनेत्रीने दुसऱ्यांदा आई होण्याचा आनंद व्यक्त केला.  

Updated: Feb 16, 2020, 12:23 PM IST
बॉलिवूड अभिनेत्रीला दुसऱ्यांदा पुत्ररत्न title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल लीजा हेडन (Lisa Haydon) दुसऱ्यांदा आई झाली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिने दुसऱ्यांदा आई होण्याचा आनंद व्यक्त केला. तिने सोशल मीडियावर तिच्या दोन मुलांचे क्यूट फोटो पोस्ट केले आहेत. शिवाय तिने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले आहे. तर लिसाने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव लियो (Leo) असे ठेवले आहे. 

सोशल मीडियावर दोन्ही मुलांचे फोटो पोस्ट करत तिने भावूक असे कॅप्शन लिहिले आहे. 'आतापर्यंत मला असा आनंद कधीही झालेला नाही. जेव्हा मी तुम्हाला दोघांना पाहते तेव्हा प्रेम व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे शब्द नसतात. मला विश्वास होत नाही की मी तुमची आई आहे.' अशा प्रकारे तिने तिच्या मुलांवरीव प्रेम व्यक्त केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

This little blessing has touched my heart in a way nothing else ever has. Been totally speechless and in love watching you both and can’t believe I get to be your mama. ‘Leo & Zack’ #Brothers And my forever valentine— Yesterday was our 5 year anniversary of the day we met, on Feb 13th one freaky Friday, life has never been the same since. Thank you Hub for building family with me. #HeartRevolution 

A post shared by Lisa Lalvani (lisahaydon) on

लिजाने २०१६ रोजी डीनो लालवानी सोबत लग्न केले. त्यांना आता दोन मुलं आहेत. तिच्या मोठ्या मुलाचं नाव जॅक आहे. काही दिवसांपूर्वी लिजाने मुलागा आणि पतीसोबत एका समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पोस्ट केला होता. लिजा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Party of four on the way 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on

लिजाने २०१० साली रूपेरी पडद्यावर दाखल झालेल्या 'आईशा' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले होतं. पण 'क्विन', 'हाउसफुल ३', 'ए दिल है मुश्किल' चित्रपटांच्या माध्यमातून ती प्रकाशझोतात आली. अभिनेत्री शिवाय ती एक उत्तम मॅडेल देखील आहे.