Lisa Haydon : बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन ही आयशा या चित्रपटामुळे प्रकाश झोतात आली. या चित्रपटातील तिची राणी ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. लिसानं त्याशिवाय क्वीन या चित्रपटात देखील चांगली भूमिका साकरली होती. लिसा हेडन ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच लिसानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून एका हटके अंदाजात लिसा कारमध्ये बसताना दिसते.
लिसा हेडननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आधी एक मुलगी ही तिच्या हातावर उभी राहते आणि गाडीचा दरवाजा न उघडता ड्रायव्हिंग सीटवर बसते. त्यानंतर लिसा ही सेम स्टंट करत ड्रायव्हिंग सीटवर बसते. यावेळी लिसानं काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा, पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची टोपी आणि टाईट्स परिधान केली आहे. लिसानं हा व्हिडीओ शेअर करत आव्हान स्वीकारले. दरम्यान, लिसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
लिसाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, "हे सगळं तू तीन मुलं झाल्यानंतर करते... ही आमच्यासाठी प्रेरणा आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "याला कोर स्ट्रेन्थ बोलतात." तिसरा नेटकरी म्हणाला, "फिटनेस लेव्हल हा 1000 टक्के आहे." आणखी एक नेटकरी म्हणाला, "तू खूप मस्त आणि फ्लेक्शिबल आहेस." काही नेटकऱ्यांनी लिसाची खिल्ली उडवली आहे. एक नेटकरी म्हणाला, "व्यवस्थित कसं बसतात हे विसरली वाटतं ही." दुसरा नेटकरी म्हणाला, "हे एकदम मस्त आहे." तिसरा नेटकरी म्हणाला, "तू आधी रस्त्यावर हाथ ठेवला, त्यानंतर तशीच गाडीत बसलीस आणि तेच घाणेरडे हाथ सगळीकडे लावलीस. किती घाण."
हेही वाचा : तू समलैंगिक आहेस? नेटकऱ्याच्या या प्रश्नावर उत्तर देत Karan Johar म्हणाला...
लिसाविषयी बोलायचे झाले तर तिनं वयाच्या 18 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कंगना रणौतच्या क्वीन चित्रपटातील तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. लिसा हेडन ही एक सुंदर अभिनेत्री असून अप्रतिम अभिनय ही करते. लिसाच्या फिटनेसविषयी बोलायचे झाले तर ती वर्कआऊट करण्यावर भर देते. त्याशिवाय ती बाहेरचं किंवा प्रोसेस्ड फूड खाण्या ऐवजी घरगुती जेवण करण्यास सांगते. तर लिसाला तीन मुलं आहेत. त्यानंतरही तिच्या फिटनेसवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही.