शाहीदच्या लेकीचं आजी नीलिमा अजीमसाठी 'लव्ह लेटर'; फोटो व्हायरल

मीराने पत्राचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

Updated: Apr 29, 2021, 05:17 PM IST
शाहीदच्या लेकीचं आजी नीलिमा अजीमसाठी 'लव्ह लेटर'; फोटो व्हायरल

मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीलिमा अजीम यांना लव्ह लेटर मिळालं आहे. हे लेटर त्यांचा मुलगा आणि अभिनेता शाहीद कपूर किंवा त्यांची सून मिरा राजपूत कपूरने लिहिलेले नाही. तर हे पत्र त्यांच्या नातीने म्हणजेचं शाहीद आणि मिरा यांची मुलगी मिशा कपूरने लिहिलं आहे. मिशाने आजीला लिहिलेलं पत्र मिरा राजपूतने सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. त्यामुळे सध्या मिशाचं सर्वचं स्तरातून कौतुक होत आहे. मिशाचं पत्र सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

मीराने पत्राचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटोमध्ये शाहीदचा हात दिसत आहे. शाहीदने मिशाला पत्र लिहिण्यास मदत केली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिशाचं  पत्र नेटकऱ्यांना चांगलचं पसंतीस पडत आहे. तिच्या या  पत्रावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

मिशाने आजीसाठी पत्रात एक सुंदर मेसेज लिहिला आहे. 'प्रिय आजी... मला तुझी आठवण येत आहे. जेव्हा काम संपेल तेव्हा फोन नक्की कर... तुझी मिशा...' आजी नीलिमा अजीमला ही नातीचं हे पत्र फार आवडलं असणार यात शंकाचं नाही. मिशाने लिहिलेल्या पत्राचा फोटो पोस्ट करत मिराने कॅप्शनमध्ये 'लव्ह लेटर' असं लिहिलं आहे. 

शाहीदच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, कबीर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिनेता शाहीद कपूर आता 'जर्सी'  चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. क्रिकेटच्या कथे भोवती फिरणारा हा एक कौटुंबिक  चित्रपट आहे.