Raj Kundra ला जामीन मिळताच शिल्पा शेट्टीच्या मुलाची पहिली सोशल मीडिया पोस्ट

पाहा राजशिवाय कसं होतं त्याचं जगणं... 

Updated: Sep 21, 2021, 12:26 PM IST
Raj Kundra ला जामीन मिळताच शिल्पा शेट्टीच्या मुलाची पहिली सोशल मीडिया पोस्ट
छाया सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई : व्यावसायिक आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती, राज कुंद्रा याची Pornography प्रकरणात जामीनावर सुटका करण्यात आली आहे. तब्बल 62 दिवसांनंतर राज कुंद्राला कारागृहाबाहेर येण्याची संधी मिळाली. अश्लील व्हिडीओ बनवून एका अॅपच्या माध्यमातून त्या प्रसिद्ध करण्याचा गंभीर आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. अखेर या प्रकरणी 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्याची सुटका करण्यात आली. 

राजला जामीन मिळाल्याचं वृत्त समोर येताच अभिनेत्री आणि पत्नी शिल्पा शेट्टी हिनं एक सूचक पोस्ट शेअर केली. ज्यानंतर आता तिचा आणि राजचा मुलगा विआन यानंही एक पोस्ट शेअर केली आहे. जिचं कॅप्शन अत्यंत बोलकं आहे. 

गणेशोत्सवादरम्यानचा एक फोटो विआननं शेअर केला. या फोटोमध्ये तो, शिल्पा शेट्टी आणि त्याच्या लहान बहिणीसह दिसत आहे. फोटोला कॅप्शन देत विआननं लिहिलं, 'जीवन हे गणपतीच्या सोंडेइतकं लांबलचक आहे. अडचणी त्या मूषकाइतक्या लहान आहेत. क्षण हे मोदकांसारखे गोड आहेत... गणपती बाप्पा मोरया.'

काय होती शिल्पाची पोस्ट? 
'मोठ्या वादळानंतरही चांगल्या गोष्टी घडतात', असं लिहित शिल्पानं एक फोटो तिच्य़ा इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला. तिची ही पोस्ट राजला जामीन मिळण्याच्या काही क्षणांनंतरच करण्यात आली होती.