मुंबई : नुकताच सर्वत्र केदार दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहिर' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सध्या संपूर्ण जगाला 'बहरला हा मधूमास नवा' या गाण्यानेही वेड लावलं आहे. प्रत्येकजण या गाण्याची हूकस्टेप फॉलो करत व्हिडिओ शेअर करत आहे. देशातच नव्हेतर बाहेरच्या देशातही या गाण्याची क्रेझ आहे. या सिनेमाला रसिंकाचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
या सिनेमात अंकूश चौशरी आणि सना शिंदे मुख्य भूमिकेत आहे. कृष्णराव गणपतराव साबळे ते महाराष्ट्र शाहीर असा त्यांचा प्रवास कसा होता हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. एकीकडे सिनेमाची गाणी हिट झाली आहे. तर दुसरीकडे या सिनेमाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाच्या निमीत्ताने महाराष्ट्र शाहिरच्या टीमने 'झी २४तास'च्या ऑफिसमध्ये हजेरी लावली होती. यावेळी या टीमने आमच्याशी दिल खुलास गप्पा मारल्या.
झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत अंकुश चौधरीला प्रश्न विचारण्यात आला की, सिनेमाचं शूटिंग रशियामध्ये झालं का? आणि महाराष्ट्र शाहिरांवर चित्रपट ते थेट रशियामध्ये शूट ते गणित कसं जुळलं? यावंर बोलताना अंकुश म्हणाला की, 'तिथे एक परिषद होती आणि त्या परिषदेसाठी खास ते तिथे गेले होते. सिनेमाची सुरुवातचं तिथून होते. आणि आम्ही दोन दिवसांचं तिथे शूटिंग केलं आहे. आणि आमच्या पंधरा वीस जणांची तिथे टीम गेली होती शूट करायला. आणि तिथे -९ टेम्पेरेचर होतं. आणि त्या थंडीमध्ये आम्ही शूटींग केलं. पहिल्यांदाच फ्रिजमध्ये बसल्याचा आनंद आला.
तेव्हा केदारने खूप सांगितलं होतं, काही काळजी नको करुस तिथे एवढी काय थंडी नाहीये. असं म्हणाला होता. पण मला तिथे गेल्यावर लक्षात आलं की, ही लोकं चार-चार कपडे घालून होती स्वेटर वैगरे घालून होते. मी बाबांचा रोल करत होतो.तो सगळा गेटअप ६० वर्षाचा आणि सदरा, लेहेंगा आणि एक जॅकेट आणि एक मफलर दिलेला आणि त्या थंडीमध्ये मी असा कडकड हलत होतो. एक्शन म्हटलं की, थांबायचो. डायलॉग बोलायचो डायलॉग बोलून झाले की पुन्हा कडकड कापायचो. सगळेजण धावायचे आणि मला मिठी मारयचे घट्ट कारण उबच मिळत नव्हती. आजूबाजून इतका थंड वारा होता ना हालत खराब झाली होती माझी. एकतर मी दात लावले होते. तेही सतत एकमेकांना आपटायचे. त्यामुळे तेही सतत टकटक आवाज करायचे.''